भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा: भंडारा शहरात शासनाच्या अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत ई-लायब्ररी तयार करण्याचे मे. प्रिया कुलर इंडस्ट्रीज भंडारा हया एजंसीला अंदाजे ३.५० करोड रू. चे कंत्राट देण्यात आले. या कामात त्याचप्रमाणे शहरातीलच छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकुलात झालेल्या कामांमध्ये प्रचंड घोळ असल्याच्या तक्रारी यापूर्वी सुध्दा आपणास तसेच ना. गिरीश महाजन, जिल्हाधिकारी भंडारा यांना करण्यात आलेल्या होत्या. परंतु वर्ष उलटुनही त्यावर कुठलीही कार्यवाही भ्रष्ट सरकारने आणि ढिम्म प्रशासनाने केली नसल्याचा आरोप शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) तर्फे निवेदनातून करीत आहे. भंडारा शहरातील नाशिकनगर, वैशालीनगर, संत रविदास मंदीर, कपिलगर येथील बौध्द विहारामध्ये डिजीटल लायब्ररीचे जे काम झाल्याचे दाखविण्यात आले आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचे असुन अंदाजपत्रकानुसार नाहीत.
अंदाजपत्रकामध्ये ज्या प्रमाणे उच्च प्रतिचे दरवाजे, टेबल, खुर्चा, कपाट, पार्टीशन, संगणक पुरवायची असतांना अगदीच कमी दर्जाच्या हया सर्व वस्तु पुरविण्यात येवून संगणकांमध्ये सॉफ्टवेअर मारून द्यायचे होते, पुस्तके डाऊनलोड करून हार्डकॉपी ठेवणेबंधनकारक होते, वाय-फाय कनेक्शन उपलब्ध करून द्यायचे होते परंतु असे कोणतेही कामे न करताच काम पूर्ण झाल्याचे दाखवून संपूर्णपणे बिलाची रक्कम राजकीय दबावातून न.प. अधिकाºयांनी कंत्राटदाराला प्रदान केली. कपिलनगर येथील लायब्ररीमध्ये साधे पंखे सुध्दा लावल्या गेली नाहीत, स्थानिक रहिवाशांनी लोकवर्गणी गोळा करून लायब्ररी मध्ये पंखे बसविले, एवढेच नाही तर तिथे जे कॅमेरे लावले होते ते कॅमेरे काढून त्याऐवजी हलक्या प्रतीचे कॅमेरे लावण्यामागचा उद्देश तो काय? अशा प्रकारचा प्रचंड घोळ करीत कंत्राटदाराने ३.५० ते ४.०० करोडचे काम मात्र ६०-७० लाखात निपटवून शासनाला करोडो रू. चा चुना लावण्याचा प्रकार झाला. याचसोबत शहरातील एकमेव मैदान असलेले छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकुलातील जलतरण केंद्र, बास्केटबॉल ग्राऊंड, आॅफीस व होस्टेलच्या दुरूस्तीकरीता जवळजवळ ९० लक्ष रू. चे काम राजकीय वरदहस्त असलेल्या एका कार्यकत्यार्ने कोणत्याही कामाचा अनुभव नसतांना पेटी कंत्राटदार म्हणून एम.आर. ढोबळे या कंत्राटदाराकडून घेतले खरे परंतु फक्त कागदोपत्री कामे केल्याचा दिखावा केल्यामुळे ज्या जलतरण केंद्रासाठी ३० लक्ष रू. खर्च झाले तो जलतरण केंद्र काम पूर्ण झाल्यानंतर कधी सुरू झाला आणि कधी बंद झाला हे क्रिडाप्रेमींना कळले सुध्दा नाही. आजही ते जलतरण केंद्र बंदअवस्थेत आहे.
ज्या बारकेट बॉल ग्राऊंडकरीता १२.५० लक्ष रू. खर्च केल्या गेले. त्या ग्राऊंडवर सिंयेटीक इनॅमल पेंटचे ७ यराऐवजी केवल २ थर लावल्यामुळे महिन्याभरातच हे थर उखडायला लागले. आज तर त्या ग्राऊंडची परिस्थिती बिकट झालेली आहे, त्यामुळे शासनाचा हा संपूर्ण पैसा सुध्दा पाण्यात गेला असतांना या संबंधीच्या दोनदा वेगवेगळया तक्रारी केल्यानंतरही हयावर कार्यवाही न होणे म्हणजे वरपासून खालपर्यंत संपूर्ण यंत्रणा हया भ्रष्टाचारात गुंतलेली असल्याचा स्पष्ट आरोप शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) तर्फे जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे यांनी केलेले असून पंधरा दिवसात या दोन्ही कामांची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांना निलंबित न केल्यास शिवसेना आंदोलनाच्या पवित्र्यात उभी असेल याची जिल्हा प्रशासनाने दखल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देतांना शिवसेना जिल्हाप्रमुख संजयभाऊ रेहपाडे, विधानसभा प्रमुख नरेंद्र पहाडे, तालुकाप्रमुख ललित बोंद्रे, शहरप्रमुख आशीक चुटे, सुधीर उरकुडे, राकेश आग्रे, हर्षल टेंभुरकर, प्रवीण पवळे,गुरूदेव साकुरे, आशीष गणवीर, ज्ञानेश्वर मते, जयेश रामटेके, सुरज साठवणे इ.शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.