मोहाडी नगरपंचायत पथ विक्रेता समिती निवडणूक; नगरविकास संघर्ष समितीचे पाच उमेदवार बिनविरोध

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : नगरपंचायत मोहाडीच्या वतीने घेण्यात आलेल्या पथ विक्रेता समिती सदस्यांच्या निवडणूकीत नगर विकास संघर्ष समितीचे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले. निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सुरेश वाघचौरे यांचा हस्ते आज शुक्रवार दि.३० आॅगस्ट २०२४ ला दुपारी १२ वाजता नवनिर्वाचित सदस्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या निवडणुकीत नगर विकास संघर्ष समितीने खुशाल कोसरे, रफिक सैय्यद, पुरूषोत्तम पातरे यांचा नेतृत्वात आपल्या पाच उमेदवाराचे उमेदवारी अर्ज दाखल केले होते. सर्वसाधारण खुला गटातून अनिल शालिकराम न्यायखोर, रामप्रसाद हरी मानकर, सर्व साधारण महिला गटातून पार्वती चिंतामण श्रीपाद, नामाप्र महिला राखीव गटातून श्रीमती हिरा प्रकाश बावणे तर अनुसूचित जाती गटातून भुरु श्रावण डोंगरे हे पाचही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

नगर पंचायत मोहाडी नगर पथ विक- ्रेता (उपजीविका संरक्षण व पथ विक्री विनियमन)अधिनियम २०१४ अंतर्गत अधिनियम २०१६ अन्वये नगर पंचायत क्षेत्र अंतर्गत पथ विक्रेताचे विनियमन व नियंत्रण करण्याकरीता नगर पथ विक्रेता समिति स्थापन करण्यात आली आहे. या करीता निवडणुकी द्वारे आठ सदस्यांची निवडणुक होणार होती पण उर्वरित तीन सदस्य हे राखीव असलेल्या जागेत मतदार यादीत पथ विक्रेता चे नाव नसल्याने ती तीन जागा रिक्त राहणार आहे. पहिल्यांदाच नगरपंचायतमधे होत असलेली पथ विक्रेता समितीची निवडणूकीत नगर विकास संघर्ष समितीने आपले पाच उमेदवार उभे केले त्या विरोधात कोणत्याही उमेदवाराने आपले अर्ज सादर न केल्याने सदर निवडणुकित नगर विकास संघर्ष समितीचे पाच ही उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने आतिषबाजी करून आनंदोउत्सव साजरा केला व छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले व विजयी रॅली काढण्यात आली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *