भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : रविवार १ सप्टेंबर २०२४ रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पवित्र सणानिमित्त विश्व हिंदू परिषदेला ६० वर्षे पूर्ण झाल्या निमित्त संपूर्ण हिंदू समाजाला एकत्र करण्यासाठी नेहरू चौक गोंदिया येथे भव्य हिंदू संगम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जगभरात राहणाºया हिंदू समाजाला एकत्र आणणे, हिंदू जागृती करणे आणि जातिभेद विसरून हिंदू समाजाला एका व्यासपीठावर आणणे हे विश्व हिंदू परिषदेचे मूळ उद्दिष्ट आहे. कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून नागपूर महानगर मंत्री अमोल ठाकरे, प्रांत सहकारमंत्री देवेश मिश्रा, कार्यक्रमाचे अध्यक्ष दुलीचंद बुद्धे, सचिव जेष्ठ नागरिक समिती, पी.प.झाडूदास महाराज, प. प. यशेश्वरानंद महाराज, प. प.राजयोगिनी रत्नमाला दीदी, पु. पू.डॉ. खिलेश्वरनाथ तुळशीबाबा उपस्थित राहणार आहेत. विश्व हिंदू परिषदेने विनंती केली आहे की, संपूर्ण हिंदू समाजातील जास्तीत जास्त सदस्यांनी कुटुंब आणि मित्रपरिवार या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन शुक्रवार ३० आॅगस्ट रोजी स्थानिक बजरंग दल कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री सचिन चौरसिया, जिल्हा सत्संग प्रमुख महेंद्र देशमुख, जिल्हा निमंत्रक अंकित कुलकर्णी, शहर मंत्री हरीश अग्रवाल, शहर संयोजक प्रमोद शहारे, ब्लॉक मंत्री भोलानाथ कोकाटे उपस्थित होते.