जनसामान्यांच्या प्रश्नावर भाकपतर्फे नगरपरिषदेसमोर तीव्र निदर्शने

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जनसामान्यांचे मूलभूत प्रश्नांना घेऊन भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यव्यापी आंदोलनाच्या आवाहनानुसार भारतीय कम्युनिस्ट पक्ष तालुका व जिल्हा भंडाºयाच्या वतीने दिनांक ३० आॅगस्ट २०२४ ला नगरपरिषदे समोर गांधी चौक भंडारा येथे पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. हिवराज उके यांच्या नेतृत्वात व कॉ. सदानंद इलमे, कॉ. प्रियकला मेश्राम, कॉ. गजानन पाचे, कॉ. भगवान मेश्राम व कॉ. माणिकराव कुकडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी मुख्यमंत्र्याच्या नावे जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व मुख्याधिकारी नगरपरिषद भंडारा यांना निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात एकूण २२ मागण्यांचा समावेश असून त्यात प्रामुख्याने भंडारा शहरातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी त्वरित उपलब्ध करावे, अतिक्रमित घरकुल धारकांना मालकी पट्टे, बेघरांना घरे मिळावीत, जातनिहाय जनगणना करणे व ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटविणे, रिक्त जागा भरणे, जुनी पेन्शन लागू करणे, निराधार ,लाडकी बहीण, दिव्यांग इत्यादींना पेन्शन योजनेची रक्कम वाढवून ५००० रुपये करणे, मोफत राशन सोबत प्रति युनिट पाच किलो राशन स्वस्त दराने उपलब्ध करणे, सरकारी रुग्णालयात रुग्णसेवा अद्यावत करणे, भंडारा येथे मेडिकल कॉलेज व महिला रुग्णालय त्वरित सुरू करणे, स्मशानभूमीचा रस्ता दुरुस्त करणे, बंद लाईट सुरु करणे, शहरातील वस्तीमधील खराब रस्ते नाल्या पुलाचे बांधकाम करणे व साफसफाई अद्यावत करणे, महिला व मुलींवरील लैंगिक अत्याचार करणाºयांना कडक शासन करणे इत्यादी मागण्यांचा समावेश होता.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *