विविध समस्याबाबत मुख्याधिकाºयांना निवेदन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तुमसर शहर शिवसेनेकडुन तुमसर शहरातील विविध समस्या बाबत आज सुनील मेश्राम आस्थापना विभाग यांच्या मार्फत मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यात प्रामुख्याने नियमित नाले सफाई करून कीटकनाशक फवारणी करणे जेणे करून डासांचा त्रास कमी होईल व रोग पसरणार नाही. शहरातील रहदारीच्या रस्त्यावर मोकाट जनावर फिरत असतात त्यामुळे लोकाना रहदारीला व वाहतुकीला अडथळा निर्माण होतो व दुर्घटना होण्याची भीती असते, अनेकदा अपघात घडल्याही आहेत. त्या जनावरांचा बंदोबस्त करावा, बाजारपेठेतील अनेक रस्त्यावर अतिक्रमण केले आहे, त्यामुळे नागरिकांना येण्याजाण्याकरीता व वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.

त्यामुळे भांडणंही होतात. तरी बाजारपेठेतील अतिक्रमण काढून रस्ते मोकळे करावे, न.प. द्वारे जनतेवर सफाई करण्याच्या नावावर जुलमी कर लादण्यात आले आहे, पण साफ सफाई शहरात होत नाही. अनेक ठिकाणी नाल्या तुडुंब भरल्या आहेत. कचरा पसरला आहे. घंटागाडी रोज येत नाही. शहरात कचरा जमा करण्याकरिता घरोघरी साहित्य वाटप झाले नाही. पण स्कॅन रोज आहे, अश्या अनेक समस्या बाबत आज निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी सुधाकर कारेमोरे जिल्हा समन्वयक, विजय पाटील शहरप्रमुख, संजय धुर्वे उपशहरप्रमुख, मनोहर गायधने विभाग प्रमुख, वामन पडोळे विभाग प्रमुख, बाळा रोहणकर विभाग प्रमुख, नामदेव निखाडे, राकेश कनोजे, अनिल भुरे, कैलाश साठवणे, शुभम पाटील, रिकी भोगे, कुणाला मेश्राम, महेंद्र कारेमोरे, रुपेश साठवणे उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *