भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा बिर्शी मार्गावर बिर्शी कडून येणारे एमजी मेरीस गाडीने मारुती ओमनी गाडीला धडक दिल्याने मारुती चालक व इतर चार असे पाच जण जखमी झाल्याने त्यांचेवर गोंदिया व नागपूर येथे उपचार सुरू आहेत. तिरोडा पोलीस सूत्रांकडून मिळालेले माहितीनुसार, दि. २८ आॅगस्ट रोजी रात्री ९ वाजता चे दरम्यान तिरोडा तालुक्यातील घोगरा येथील महिलेस गोंदिया येथे बाळंतपणाकरता दाखल करून घोगरा येथे मारुती ओमनी क्रमांक एम एच ३१ सीआर ३३१४ ने रात्री ९ वाजता चे दरम्यान तिरोडा कडून घोगराकडे जात असता बिर्शी कडून तिरोडाकडे येणारे एमजी मॅरीस क्रमांक एम एच ३५ ए डब्ल्यू ४३०२ वाहनाने समोरून जबरदस्त धडक दिल्याने मारुती चालक नितीन प्रकाश कुंभरे (३५) गंभीर जखमी झाल्याने त्यास नागपूर येथील मेयो रुग्णालयात दाखल केले असून, विद्या प्रकाश बागडे (६०), प्रकाश चतरु बागडे (६७), दीक्षा राहुल बागडे (२५), नितीन प्रकाश बागडे (३५) वर्ष जखमी झाल्याने त्यांचेवर गोंदिया येथे उपचार सुरू असून घोगरा येथील पोलीस पाटील चंद्रहास वासुदेव भांडारकर यांचे तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम २८१,१२५ (बी) सहकलम १८४ मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आले असून पुढील तपास करीत आहे.