भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. महाराष्ट्रात व त्यातल्यात्यात विदर्भात, पोळा हा एक शेतकºयांचा मोठा सण आहे. त्या दिवशी बैलांना कामकाजापासून सुट्टी असते. त्या दिवशी बैलांना न्हाऊ माखू घालतात. त्यांना गोड पुरणपोळीचे जेवण घालतात, त्यांना सजवतात व मिरवतात. आजच्या दिवशी त्यांची घरोघरी पूजा होते. मात्र, लहान मुले मोठे बैल नेऊ शकत नाहीत. ते त्यांना आवरूपण शकत नाहीत. म्हणून त्यांच्या हौस मजेसाठी तान्हा पोळा साजरा करण्यात येतो. त्या दिवशी, लहान मुले लाकडापासून तयार केलेला बैल घेऊन खºया बैलाप्रमाणेच या लाकडाच्या बैलाचा तान्हा पोळा साजरा करतात. विदर्भात खास बालगोपालांसाठी पोळ्याच्या दुसºया दिवशी तान्हा पोळा साजरा केला जातो. या दिवशी सर्व लहान मुले व मुली लाकडाच्या बैलाला सजवून त्याची मिरवणूक काढतात. हा बैल सजवण्यासाठी कितीतरी दिवस आधीपासूनच त्यांची लगबग सुरू झालेली असते. बैलाला रंगवणे, तोरण, फुलांनी सजवणे, त्याला आकर्षक बनवणे अशी लगबग बालगोपाळांची असते.
श्रावण महिन्याची सांगता बैलाच्या पोळ्याने होते तर त्यानंतर येणाºया भाद्रपद महिन्यात प्रारंभ तान्ह्या पोळ्यानी होतो.भारतीय संस्कृतीचा प्रत्येक सण मंगलमय प्रभात घेऊन येत असला तरी तान्हा पोळा मात्र आनंदी पहाट घेऊन आगमन करत असतो. पहाटेपासून मारबत काढण्याची तयारीहोते.रोगराईझ्रजर-ताप-पाप घेऊन जा गे मारबत… म्हणून दिवस उजाडण्यापूर्वीच किंवा उजाडल्यानंतर अगदी थोड्या वेळातच तिला गाव सिमेबाहेर घालविले जाते. थोड्या वेळातच तिला गाव सिमेबाहेर घालविले जाते. मातीची मारबत घालवून त्याऐवजी पळसपत्राची पाने मारबतीचे प्रतिक म्हणून झाडीपट्टीत घरी लावतात. मारबत गेल्यानंतर पोळ्यानंतरची सकाळ बालक नंद्यांनी सुरू होते. आदल्या रात्री लाकडी नंद्यांना रंगवून व बेगट लावून सजविले जाते.सकाळी स्रान करून व नवीन कपडे घालून लहान मुले आपला लाकडी नंदी घेऊन घरोघर फिरतात किंवा ओळखीच्या घरी जाताना दिसतात. पोळ्याच्या दिवशी घरी येणाºया बैलांच्या जोडीप्रमाणे या नंदीधारक बालकांचे कौतुकाने स्वागत होते. त्यांना दक्षिणास्वरूप पैसे दिले जातात.दुपारी २ वाजेपर्यंत हा उपक्रम चालू असतो. त्यानंतर बैलांच्या पोळ्याप्रमाणे गावातील चौकात ग्रामपंचायत भवनात किंवा एखाद्या देवळात विशेषत: मारुतीच्या पारावर हा तान्हा पोळा भरतो.
या तान्ह्या पोळ्यात लहान मुले आपले नंदी सजवून आणतात व स्वत:ही एकप्रकारे सजलेले असतात काही मुले शेतकरी पोशाखात असतात यात काही मुलीही असतात हे सर्वजण पोळ्याच्या ठिकाणी एका रांगेत बसतात. सर्व मुलांना प्रथम आयोजक मंडळाकडून किंवा ग्रामपंचायतकडून प्रसाद वाटला जातो व नंतर दक्षिणा म्हणून पैसे दिले जातात. काही ठिकाणी नंदी सजावट स्पर्धा ठेवली जाते व बक्षिस समारंभसुद्धा साजरा केला जातो. प्रथम चांगले नंदी सिमीत प्रमाणात बाहेर काढून त्यातून पहिले तीन किंवा पाच क्रमांक पारितोषिक प्राप्त ठरविले जातात़. काही ठिकाणी बालकांच्या बौद्धीक स्पर्धा घेतल्या जातात व सभेचे आयोजन केले जाते. बालकाचे महत्त्व यावर प्रकाश टाकतात. यावेळी सुद्धा झडत्या पार्वती पती हर बोला हर हर महादेव चा जयजयकार केला जातो. पारितोषिक प्राप्त नंदीधारकांना बक्षिसे दिली जातात सर्व नंदीधारकांना दक्षिणा स्वरूपात पेसे किंवा वस्तूरुपात भेट देऊन प्रस- ाद वाटला जातो. शेवटी नारळ फोडून खोबरे दिले की पोळा फुटतो काही ठिकाणी आरती केली जाते आरती घेऊन नंदीधारक आपापले नंदी घेऊन घरी परतायला लागतात. काही ठिकाणी या तान्ह्या पोळ्याचे आयोजनसायंकाळी ५ वाजता केले जाते.
गावातीलच प्रत्येक मोहल्ल्यातील नंदी, भजन दिंडीने, वाजतगाजत किंवा लेझीमच्या तालावर नाचत मारुतीच्या देवळाजवळ एकत्र आणून तान्हा पोळा भरविला जातो. याबाबतीत पोळ्याप्रमाणेच त्या पाठीमागची एखादी कथा प्रचलित नाही तरी पण यातील संकेत भगवान शिवशंकर व त्यांचा नंदी यांच्याशी संबंध जोडणारा आहे़. तान्हापोळा म्हणजे तान्हुल्यांचा पोळा़ याला शिव-नंदी पोळा असेही म्हणता येईल.लहान मुले शिवासारखी साधी व भोळी असतात.शिवाचे वाहन नंदी आहे़.म्हणून लाकडाचा बैल करून त्याला नंदी संबोधले जाते.पशूपाल वकृषी संस्कृतीत महत्त्व पावलेल्या या जीवनाचा अंग बनलेल्या बैलांविषयी लहान बालकांच्या मनात प्रेम व श्रद्धा निर्माण करण्याची जणू ही नांदी असते.मुलांच्या या तान्हा पोळ्याच्या आयोजनात पुरूषाप्रमाणेच महिला वर्गही आघाडीवर आहे़.काही ठिकाणी महिला स्वतंत्रपणे तान्हापोळा भरवितात.आपल्या तान्हुल्यांचा आनंद द्विगुणीत करण्याकरिता फुगड्या घालतात. आपल्या संस्कृतीने जीवनाच्या सर्वांगाचा साकरल्याने विचार केला आहे.पशुपक्ष्यांना पुजले आहे. किटक-मुंगीत चेतन तत्त्व पाहिले आहे.त्याच संस्कृतीने बालकांना लहान बळीराजा करून त्याच्या लाकडी नंदीस बैलांच्या रांगेत बसविले आहे.
बैल राबण्यासाठी व नंदी पुजण्यासाठी हे चित्र समाज जीवनात रुढ झाले आहे. बैलाविषयी प्रिती व पुज्यभाव नंदीच्या माध्यमातून लहान मुलात अप्रत्यक्षपणे वाढीस लावणे हा त्या पाठीमागील उद्देश असावा,असे येथील तान्हा पोळ्याकडे पाहिले असता दिसून येते.श्रावण मास हा हिंदूचा पवित्र महिना असल्यामुळे अनेक प्रकारची बंधने माणसे स्वयंस्फूतीर्ने किंवा शस्त्राधार गावात नंदी फिरतो. तोपर्यंतच त्याच्या मागेच फिरायचे तो उत्साह पाहण्यासारखा होता तो बालपणातला आनंद खरेच खूप वेगळा होता.घरोघरी नंदयाचे पाय मोठ्या श्रद्धेने धुतल्या जायचे त्याची पुजा करित असत आपल्याला परिने जेवढे दाण,दक्षिणा करावे वाटते तेवढे द्यायचेच महादेवाचा वाहन म्हणून नंदयाचा पुर्णपणे मानसन्माने त्याचा आदर करित असते एक महिण्याचा बाळ असेल तरीही त्याला नंदयाच्या पोटाखालून धरले जाते असत. त्यावेळी कुणालाही त्याने इजा केली नाही सर्व लहान मुले नंदयाला पाहून आनंदित होत असते.हे सारेच उदाहरण मागच्या गेलेल्या पिढीत पाहायला मिळायचे.आज तेवढ्या प्रमाणात पहिले जो आनंद पाहायला मिळत होता तो आता फारच कमी दिसत आहे आताच्या लहान मुलांना नंदी फक्त तान्हया पोळ्याच्या दिवशी सजवतांना किंवा त्याला फिरवतांना खुप खुप आनंद होते. दरवर्षी पारंपारिक पद्धतीने मोहाडी तालुक्यात १०८ गावात मोठ्या प्रमाणात ग्रामीण भाग असल्याने तान्हापोळा उत्सव साजरा करण्यात येते.
मोहाडी पोलीस स्टेशन ठाणेदार सुरेंद्र बेलखेडे, पोलीस उपनिरीक्षक कातीकराम दूधकावरा, अतुल कुंभलकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस स्टेशनअंतर्गत ३१ गावातील आणि शहरात वडेगाव, मोहाडी व कळमना असे असून विविध भागात ५ तान्हापोळे भरनार आहेत. ग्रामीण भागात ४५ तान्हापोळे भरनार. आंधळगाव पोलीस स्टेशन अंतर्गत ४७ गावात ठाणेदार सुनिल राऊत,पोलीस उपनिरीक्षक पुष्पपाल आकरे, विजेंद्र सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात १ तर ग्रामीण भागात ४२, वरठी पोलीस स्टेशन अंतर्गत २२ गावात शहरात ७ तर ग्रामीण २० ठाणेदार अभिजित पाटील,सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय मडावी, निलेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात २० तर ग्रामीण भागात १५, करडी पोलीस स्टेशन अंतर्गत २५ गावात ठाणेदार विलास मुंडे, वैभव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात १ तर ग्रामीण भागात २४ तान्हापोळे भरविण्यात येईल. मोहाडी तालुक्यातील ४ पोलीस स्टेशनअंतर्गत १२५ गावातील शहरात १४ तर ग्रामीण भागात १२८ असे एकूण १४२ तान्हापोळे भरणार आहेत. यासाठी भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक नूरल हसन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक ईस्वर कातकडे, पोलीस उपविभागीय अधिकारी अशोक बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा व होमगार्डचा बंदोबस्त ठेवण्यात येतोय.