भंडारा पत्रिका/यशवंत थोटे मोहाडी : ढेकून, मोंगसा, रोगराई, ईडा, पिडा, जादुटोणा करणाºयाला घेऊन जागे मारबत…असा स्वर ग्रामीण भागात आज सकाळी दुमदुमणार आहे़. पोळ्याच्या पाडव्याला ऐकायला मिळणाºया या लोकगीताने सारा परिसर निनादणार आहे. शहरी भागात पिवळी मारबत मिरवणुकी काढण्याचे प्रकार सुरू झाले. शहरी भागात लाकडी नंदीबैलाची पुजा करून तान्हा पोळा साजरा केला जातो. पूर्व विदर्भातील ग्रामीण भागात मात्र मारबत काढण्याची प्राचीन परंपरा आजही कायम आहे. मनातली सगळी भडास बिनधास्तपणे व्यक्त करण्याचा सण म्हणजे पोळ्याचा पाडवा या हिंदू सणाला पैराणिक कथेची जोड आहे. मारबती बाबतीतही एक आख्यायिका वयोवृद्ध मंडळी सांगतात द्वापार युगात श्रीकृष्ण जन्मानंतर कंसाने श्रीकृष्णाचा वध करण्यासाठी पुतणा राक्षसणीची निवड केली.पुतणा राक्षसणीने श्रीकृष्णाच्या मावशीचे रुप धारण करून गोकुळात प्रवेश केला. नंदाच्या घरी खेळात रममाण श्रीकृष्णाला कडेवर घेऊन दूध पाजायला सुरूवात केली.दुधातून विष पाजून श्रीकृष्णाला ठार मारणे, हा तिचा दृष्ट हेतू होता.
श्रीकृष्णाने मात्र, पुतण्याच्याच शरिरातील संपूर्ण रक्त ओढून घेतले. पुतणा आपले आक्राळ विक्राळ रुप धारण करून धारातिर्थ कोसळली. गोकुळातील जनतेला सर्व प्रकार लक्षात आला. मात्र, पुतणा राक्षणसीचा देह दारातून बाहेर निघेना म्हणून तिचे हात-पाय कापून तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. गावाच्या वेशीवर आणून तिचे दहन करण्यात आले. या दिवसाची आठवण म्हणून पोळ्याचा पाडव्याला खेडोपाडी मारबत काढली जाते.ग्रामीण भागात पहाटेच्या सुमारास मातीची हात- पाय नसलेल्या बाहुलीच्या आकाराची प्रतिकृती घरातून बाहेर काढली जाते. घरातील पुरूष मंडळी त्या प्रतिकृतीवर दिवा व सोबत पोळ्याच्या दिवशी केलेल्या पाहुणचारापैकी एक वडा अथवा पुरी, सोबत घेऊन जातता ढेकून, मोंगसा, रोगराई, जादुटोणा करणाºयाला घेऊन जा गे मारबत… अशा घोषणा दिल्या जातात. गावातील कुप्रवृत्तीच्या व्यक्तींच्या नावाचा उल्लेख हमखास केला जातो.गावाच्या वेशीवर आल्यानंतर या मारबतीचे ठराविक ठिकाणी दहन केले जाते. सोबत आणलेले वडा-पुरी तिथे ठेवली जाते. ठराविक समाजातील लोक ही वडापुरी घेऊन जातात. काही भागात आजही ही प्रथा अस्तित्वात आहे. मोहाडी परिसरात मारबतीचे दहन झाल्यानंतर ती ओल्या मातीने झाकली जाते. स्थानिक भाषेत यास लिपणे म्हणतात. दहन केलेल्या कुप्रवृत्तीने पुन्हा आपल्या गावात प्रवेश करू नये, हा त्यामागचा उद्देश एक विशेष पद्धत रुढ आहे.
आज मारबत मायबाप सरकारने त्याला जोडीस जोड म्हणजे दारूची व्यवस्था गावागावातून केलेली असतेच त्यामुळे आणखीच या मारबतीला जोर चढला असतो.पोळा आणि पाऊस झाला भोळा या युक्तीप्रमाणे पावसाचे प्रमाण कमी झाले असते. पावसाळ्यातील रोगरा-ई या पुढे बाधीत होऊ नये म्हणून किटक व डास,माशा, ढेकूण रोगराई कमी व्हावी म्हणून प्रतिकात्मक रुपाने या सर्वांना घेऊन जागे मारबत असा संदेश दिला जातो. आधुनिक काळात वाईट प्रवृत्तींनाही घेऊन जागे मारबत या घोषाने समाज सुधारण्याचाही संदेश दिला जातो. दरवर्षी पारंपारिक पद्धतीने मोहाडी तालुक्यात मोहाडी, आंधळगाव, करडी, वरठी पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या गावात मोठ्या प्रमाणात ग्रामीण भाग असल्याने तान्हापोळा उत्सव साजरा करण्यात येते. मोहाडी शहराची लोकसंख्या १० हजार ५२७ असून गावातच वडेगावचा बैलपोळा छत्रपती शिवाजी महाराज चौकात तेली समाजाच्यावतीने, मोहाडीचा पोळा रविवार बाजारात तर कळमना गावचा पोळा श्री संत तुकाराम चौकात भरविण्यात येतोय.पोळा हा सण ग्रामीण भागातील लोकांसाठी विशेष महत्त्व ठेऊन राहणारा सण आहे.
मोठा पोळा हा वर्षभर शेतात राबणाºया बैलांचा संध्याकाळी पोळा फुटतो आणिसर्वांना वेध लागतात ते पोळ्याच्या पाडव्याचे म्हणजे मारबतीचे मोहाडी शहरात बैलपोळ्याच्या सायंकाळपासून बडगे, घोंगडी घेऊन जंगलात जातात तेथून पळसाच्या बिबाच्या फांद्या व सोबत शतावरी म्हणजेच मारबतीचे पाने घेऊन येतात.आणलेले सर्व साहित्य घराच्या दारात खोचून ठेवल्यानंतर दुसºया दिवशी भल्या पहाटेपासून मारबतीच्या नावाने बोंबा सुरू होतात. दारात खोचलेली पाने व बनविलेली मुर्ती घेऊन गावाच्या सिमेवर जाऊन तिचे दहन केले जाते.मात्र,आज वाढती महागाई व शेतीच्या उत्पादनात आलेली मोठी घट यामुळे खºया अथार्ने या मारबतीच्या मदतीवेळी शेतकरी बांधवांवर आली आहे. यंदा हंगामाच्या सुरूवातीपासूनच अनेक अडचणींचा सामना करीत आहे. आज धान पिकासह सोयाबीन आणि इतरही पिकांवर अळी, किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. औषध आणि इतर साधनांच्या माध्यमातून उपाययोना सुरू आहेत. इतर बाबतीत मारबतीला विनविण्यापेक्षा वाढत्या कोरोनाला घेऊन जा..गे…मारबत… म्हणण्याची वेळ शेतकºयावर आली आहे़.