ट्रॅक्टरचा पोळा भरविणारे कुशारी राज्यातील पहिले गाव

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : बैलपोळा हा शेतकºयांसोबत राबणाºया बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण आहे. संपूर्ण राज्यभरात या सणाचा उत्साह असतो. दरम्यान यंत्रयुगामुळे बैलजोड्यांची संख्या घटली आहे. शेतीची कामे ट्रॅक्टरच्या माध्यमातून करण्याकडे शेतकºयांचा कल आहे. जणू ट्रॅक्टर हेच आता बैलाच्या जागी काम करू लागले आहेत. त्या अनुषंगाने ट्रॅक्टरचा पोळा भरविण्याची परंपरा मोहाडी तालुक्यातील कुशारी गावात जोपासली जात आहे.

मंगळवार दि.३ सप्टेंबर २०२४ ला बैलपोळ्याच्या दिवशी या गावात ट्रॅक्टरचा पोळा भरविला जातो. गेल्या २०१५ पासून या परंपरेला सुरुवात झाली, ती आजतागायत जोपासली जात आहे. कुशारी हे मोहाडी तालुक्यातील तीन हजार लोकवस्तीचे गाव आहे. या गावात पूर्वी प्रत्येक शेतकºयांकडे बैलजोड्या होत्या. पोळ्याला सजविलेल्या बैलांचा आणि शेतकºयांचा उत्साह पाहण्यासारखा असायचा. मात्र काळ बदलत गेला तसे येथील शेतकºयांनी परिवर्तनाची कास धरली. शेतीकामाला मजूर मिळणेही कमी झाले. त्यामुळे हळूहळू ट्रॅक्टरचा वापर वाढू लागला. बैलजोडी सांभाळणे आवाक्याबाहेर झाल्याने तसेच खर्चिक असल्याने शेतकºयांनी बैलजोडी विकून ट्रॅक्टर घेतले. ग्रामीण भागात शेतकरी पोळ्याचा सण मोठया उत्साहाने साजरा करतात. तो उत्साहकायम टिकून राहावा म्हणून कुशारी येथे ट्रॅक्टरचा पोळा भरविण्याची संकल्पना समोर आली. ही अनोखी परंपरा सुरू ठेवण्यासाठी कुशारी येथील ग्रामविकास अधिकारी दिगंबर गभणे, उपसभापती विठ्ठल मलेवार, सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांचे सहकार्य लाभत आहे. सर्वप्रथम तत्कालीन जय महाराष्ट्र मराठी वृत्तवाहिनीचे भंडारा जिल्हा प्रतिनिधी प्रविणतांडेकर, दैनिक भंडारा पत्रिकाचे तालुका प्रतिनिधी यशवंत थोटे यांनी कव्हर केली होती.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *