भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : गणेशोत्सवादरम्यान मोठया प्रमाणावर जलोष्ष व उत्साह पाहायला मिळतो,मात्र उत्सव साजरा करतांना कायदा व सुव्यस्थेचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत पोलीस विभागाच्या गणेशोत्सवा दरम्यानच्या तयारीचा आढावा घेतला. बैठक आयोजित केली. यावेळी ही माहिती देण्यात आली व सूचना करण्यात आल्या. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, यानी जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी यांना निर्देश दिले. यावेळी अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे ,मुख्य कार्यकारी अधिकारी नगर परिषद पूसदकर, जिल्हा नियोजन अधिकारी एस.के. बोरकर,निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहिती अपर पोलिस अधिक्षक श्री.कातकडे यांनी दिली. तसेच गणेशोत्सवा दरम्यान वाहतुक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी योग्य त्या सूचना वाहतुक विभागाला दिल्यात.
उत्सवादरम्याना कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच विदयुत व्यवस्थेची तपासणी करून शॉर्ट सर्कीट होणार नाही याची दक्षता घेण्याचे त्यांनी निदेर्शीत केले. ‘गणेश विसर्जन’ आणि ‘ईद’ उत्सव हे मोठे सण पाहता सामाजिक सौहार्द राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले. गणेशोत्सव काळात ध्वनीक्षेपक वापरण्यासंदर्भातील सूचना तसेच विसर्जनासाठी शहरात उभारण्यात आलेले कृत्रिम तलाव, मार्ग याविषयीही त्यांनी सविस्तर माहिती अपर पोलिस अधिक्षक यांनी दिली. शहरात पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्यासाठी नगर प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहिती नगर परिषद विभागाचे अधिकारी यांनी दिली. मातीच्या व पर्यावरणपूरक गणेशमुर्त्यांची स्थापना व्हावी तसेच विसर्जनासाठी होणारी गर्दी व गैरसोय टाळण्यासाठी नगरपरिषदेने योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश श्री.कुंभेजकर यांनी दिले.