भंडारा पत्रिका / प्रतिनिधी कोथुर्ना: येथून जवळच असलेल्या इंदूरखा या गावी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा बैल पोळा भरविण्यात आला गावातील शेतकºयांंनी आपल्या बैल जोडी सजावट करून गाव शिवारात तोरणात आणले. आज शेतकºयांसाठी आनंदाचा क्षण असतो. शेतकरी शेतात राब राब राबतो. बैलाची पूजा उत्साहात साजरी केली जाते. शेतकरी आपल्या बैलाची जोडी घेऊन इतर शेतकºयांकडे फेरी घालत घेऊन जातात. शेतकरी एकमेकांची भेट घेतात. इंदूरखा येथील शेतकरी तथा उपसरपंच सदानंद मोहतुरे, शंकर मोहतुरे, अमृत मोहतुरे, गणेश मोहतुरे, गावातील शेतकरी यावेळी उपस्थित होते.