भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : समोर येणारे गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद चे संबंधाने पोलीस स्टेशन तिरोडा येथे झालेले शांतता समितीचे सभेत संबंधित विभागाचे अधिकारी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व मुस्लिम संघटनेचे अध्यक्ष, शांतता समीती व डी.जे.मालकांची सभेचे मार्गदर्शन करताना उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झरकर यांनी सन उत्सव नियमांचे पालन करून आनंदात शांततेत पार पाडा अन्यथा पोलीस कारवाई सामोरे जावे लागेल असे सांगितले
जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी जिल्ह्यात गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद सन शांततेत पार पडावा म्हणून जिल्हा व पोलीस स्टेशन स्तरावर शांतता समितीचे सभा घेण्याचे केलेले आवाहनानुसार दिनांक 2 सप्टेंबर रोजी तिरोडा पोलीस स्टेशन येथे उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झरकर यांचे अध्यक्षतेत झालेल्या शांतता समितीचे सभेत नगरपरिषद मुख्याधिकारी राहुल परिहार, उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक राहुल शेंडे, पोलीस निरीक्षक अमित वानखेडे, नायब तहसीलदार ए.पी. मोहनकर वीज वितरण कंपनीचेसहाय्यक अभियंता मेश्राम, नगरपरिषदेचे मृत्युंजय कांबळे शांतता समितीचे सदस्य सुनील भाऊ पालांदुरकर ,रमाकांत खोब्रागडे, शामराव झरारीया, सलाम भाई शेख ,अशोक अरोरा सुनी मुस्लिम जामा मस्जिद कमिटी अध्यक्ष हाजी सलाम भाई शेख यांचे सह तालुक्यातील गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व डी.जे मालक यांचे उपस्थितीत झालेले सभेत मुख्याधिकारी राहुल परिहार यांनी शहरातील गणेश विसर्जना करिता विसर्जन स्थळी सर्व प्रकारची प्रकाश, जिवन रक्षक,व स्वच्छतेची व्यवस्था केली असून वीज वितरण कंपनीचे मेश्राम यांनी गणेश मंडळाना आवश्यक असलेला तात्पुरति वीज पुरवठा देण्यात येईल मात्र याकरता रीतसर अर्ज करावा तर उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक राहुल शेंडे यांनी गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद प्रसंगी निघणाºया मिरवणुकांचे वेळेस उपजिल्हा रुग्णालयातर्फे विशेष आरोग्य सुविधा मिळण्याकरता पथक तयार करू असे सांगितले
यावेळी सर्वांना मार्गदर्शन करताना उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झरकर यांनी गणेशोत्सवाचे पेंडॉल व देखावे वाहतुकीस अडचण होऊ नये अशा जागी उभारावे तसेच डि.जे.मालकांनी डी.जे.चि आवाज कुणासही त्रास होऊ नये इतकाच ठेउन सर्व नियमाचे पालन करून शासनाद्वारे गणेशोत्सव मंडळा करता ठेवलेले पारितोषिक मिळवण्याकरता आवश्यक देखावे निर्माण करून पारितोषिक मिळवण्याचा प्रयत्न करावा व कुठल्याही प्रकारचे कायद्याचा भंग होऊ नये याची काळजी घ्यावी गणेशोत्सव किंवा ईद-ए-मिलाद कमिटी कुठल्याही अडचणी सल्ला किंवा मदतीकरिता संबंधितांचा व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात येत असून कोणासही केव्हाही कुठलीही अडचण आल्यास या ग्रुप द्वारे संबंधित विभागाचे अधिकाºयांशी संपर्क साधता येईल असे सांगितले या सभेचे संचलन महिला समुपदेशन केंद्राचे दिनेश कावडकर प्रास्ताविक व आभार पोलीस निरीक्षक अमित वानखेडे यांनी मानले.