भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली_ : स्थानिक अकॅडमीक हाईट्स पब्लिक स्कुल (एकोडी रोड) साकोली येथे भारतीय संस्कृतीनुसार कृषीप्रधान असलेल्या भारतीय शेतकºयांचा पारंपारिक सण “बैलपोळा” हर्ष उल्हासात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना बैल पोळा ह्या सणाचे महत्त्व काय आहे ह्यासाठी पुर्व प्राथमिक च्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी नंदी बैलांना थाटामाटाने सजवुन शाळेत आगमन केले.विद्याथ्यार्ची फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित करण्यात आली.
सर्व नंदी बैलांना सोबत घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले, विद्यार्थ्यांनी विविध शेतकरी,शंकर,पार्वती च्या वेशभूषा परिधान करून बैलपोळा सणाचे औचित्य साधले. मुख्याध्यापिका संचिता ब्रम्हचारी ह्यांनी सर्व पालक,विद्यार्थी,शिक्षकांना बैल पोळ्याच्या मंगलमय शुभेच्छा देवून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी,पालक गण,शिक्षक गण आणि शाळेचे व्यवस्थापक श्री.जी.एच ठाकरे, मुख्याध्यापिका डॉ.संचिता ब्रम्हचारी, प्रा.अमितोज कौर, रिना फ्रॅन्सिस,अतुल नंदेश्वर ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत पोळा उत्सव साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवाली गुप्ता, मनोजकुमार पेटकुले, शेहबाज खान,धामेद्र वलथरे,धनराज मेश्राम,निखिल निंबेंकर,सारीका ठाकरे,नंदा कापगते,मोहन रहिमतकर, सचिन मारवाडे,निशिकांत माटुरकर, केतन हत्तीमार ,मृणाली,कोसे,पुनम वाडिभस्मे,शिरीन सेख,लता कटरे,प्रिती धुर्वे,ममता सरोदे ,यशी टंग,दीक्षा,गेडाम , निशा रामटेके,नितु राऊत, छाया राऊत,मयुरी हटवार,रेश्मा ढोमने, विजया भेंडारकर, छाया रुखमोडे,अवलिया पठाण,श्रमिका पातोडे, ए.एच. पि.एस स्कुल चे सर्व शिक्षक वृंद शिक्षकेत्तर कर्मचारी ह्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगिता हुमणे,ह्यानी केले. तर आभार लावण्या आसलवार ह्यांनी मानले.