भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : तुमसर शहरातील मुख्य बाजारपेठेत सणासुदीच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे, मात्र वाहतूक कोंडीत ताटकळत राहावे लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. गणेशोत्सवापूर्वी वाहतूक सुरळीत राहील यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित एच मेश्राम यांनी भंडारा जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधिक्षक नरूल हुसन यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. तुमसर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी रस्ते मात्र, पूवीर्पासून अरुंदच आहेत. अशातच खरेदीसाठी आलेले ग्राहक रस्त्याच्या कडेला दुचाया उभ्या करीत असल्याने रस्ते आणखीनच अरुंद होतात.
परिणामी नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. दरम्यान तुमसर शहरातील जवाहर, बावनकर चौक ते जुना बसस्थानक पर्यंत नागरिकांना, शालेय विद्यार्थ्यांना बºयाच वेळ वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. सराफा मार्ग, मज्जित चौक, जवाहर चौक आणि जुना बसस्थानक चौक अशा चार ठिकाणी जाण्यासाठी रस्ता असल्याने नेहमीचया ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या भेडसावते. अशातच शहरातील मुख्य मार्गावरून अवैधरित्या ओव्हरलोड क्षमतेपेक्षा जास्त वाळू, रेती वाहतूक टिप्परने होत असून यामध्ये वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून संबंधितविभागाचे नियंत्रण राहत नाही. तसेच शहरात नव्या पाणीपुरवठा योजने अंतर्गत रस्त्यावर जागोजागी खोदकाम केल्यामुळे व कंत्राटदाराकडून पाईपलाईन घातल्यानंतर सदर खड्डे बुजवण्याचे काम ह्या अर्धवट असल्याने दोन्हीकडून रस्ता अरुंद झाला आहे. परिणामी अपघाताची शयता देखील बळावली आहे.
वाहतूक कोंडी हा सगळा प्रकार सुरू असताना वाहतूक पोलीस थातुरमातुर येतात. मात्र नियमितपणे संबंधित स्थळी आढळून येत नाही. त्यामुळे तुमसर शहरात वाहतूक पोलीस कार्यरत आहे की नाही? असा सवालयावेळी अनेकांनी उपस्थित केला. शहरातील ही परिस्थिती बदलविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी नागरिकांना वाहतुकीचे नियम समजावण्याची आणि ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होते, अशा ठिकाणी सातत्याने कर्तव्य बजावण्याची गरज निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, याबाबत पोलिसांकडून जनजागृतीपासून दंडात्मक कारवाया वाढविण्याची गरज आहे. सदर रस्त्यावरील खोदकाम आणि नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्षितपणा होत असल्याचे दिसून येते.