संजय कोलते भंडाºयाचे नवे जिल्हाधिकारी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा: जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे स्थानांतरण होऊन भंडाºयाचे नवे जिल्हाधिकारी म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी संजय कोलते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मागील दोन वर्षांपासून योगेश कुंभेजकर हे जिल्हाधिकारी म्हणून जिल्ह्याचा कारभार अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हाताळीत होते. शिस्तप्रिय अधिकारी अशी ओळख असलेल्या कुंभेजकर यांची आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बदली होणार असे बोलल्या जात होते. २०१० च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असलेल्या कोलते यांनी नागपूर येथे रोहयो आयुक्त, उस्मानाबाद जिल्हा परिषदेची सीईओ, पुणे स्मार्ट सिटी प्रकल्पाचे सीईओ अशा अनेक जबाबदाºया पार पडल्या आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *