भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : राज्यातील नगर परिषद अधिकारी-कर्मचारी यांच्या विविध सेवा विषयक मागणीकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने त्याविरोधात महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटना, महाराष्ट्र राज्य जिल्हा भंडारातर्फे येत्या काळात नगर परिषदेतर्फे नागरीकांना देण्यात येणाºया अत्यावश्यक सेवा बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटना, महाराष्ट्र राज्य यांचेद्वारे महाराष्ट्रातील नगर परिषद संवर्गीय अधिकारी/ कर्मचारी यांच्या विविध सेवा विषयक मागणीकडे सरकारचे कायम दुर्लक्ष होत असल्याने संघटनेतर्फे दि.२९ आॅगस्ट २०२४ पासुन संप पुकारण्यात आला आहे. मात्र त्याकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने आधिकारी व कर्मचारी यांच्यात शासणाप्रती रोषाची भावना निर्माण होत आहे.
करीता शासनाचे यावर ठोस उपाययोजना करावी याकरीता आज दि.४ सप्टेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटना जिल्हा भंडारातर्फे आ.नरेंद्र भोंडेकर व भंडारा निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देवुन मागण्या पुर्ण न झाल्यास नगर परिषदेतर्फे देण्यात येणाºया अत्यावश्यक सेवा बंद करण्याचा इशारा निवेदनातुन देण्यात आला आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटना, जि. भंडारा चे रसिका लांजेवार, अश्विनी चव्हाण, अंजली बरसागाडे, कल्याणी भवरे, आकाश साहारे, गणेश मुळे, विवेक कापगाते, स्वप्नील हमाणे, जयभीम पाटील, रविश रामटेके, समीर गणवीर, स्वप्नील इंगोले, मृणाल हुमणे, शिवानंद बरडे, अमित नंदागवळी, सुनिल साळुंखे, देवानंद सावके, आकाश शहारे, मुकेश कापसे, पवण कनोजे, प्रमोद निकाजू, अतुल पाटील, मुकेश शेंद्रे, गणेश मुळे, स्वप्नील इंगोले, निखिल टट्टे, समीर गणवीर, धनश्री वंजारी, मोनिका वानखेडे, रशिका लांजेवार, इंगलेस्वरी, अश्र्विनी चव्हाण, मिथुन मेश्राम, प्रणय सोनेकर, हर्षल शेंडे, बबलू संदेश, निकेश सांडेकार आदि उपस्थित होते.