भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा साकोलीचे आमदार नाना पटोले यांचेवर आक्षेपार्ह शब्दांची पोस्ट ‘साकोली की गर्जना’ या फेसबुक आयडीवरून आणि काही व्हाट्सअप समुहात पोस्ट वायरल करण्यात आली आहे. आमदार नाना पटोले यांची समाजात प्रतिमा कशी खराब होईल याचे षडयंत्र चालविले जात असल्याने यातील दोषींना अटक करण्यात येऊन कारवाई करावी यासाठी मंगळवार ०३ सप्टेंबरला साकोली पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांना शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
दोषींवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शहर कॉंग्रेस कमिटीने दिला आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, साकोली गर्जणा फेसबुक व व्हॉटस्टअप ग्रुपच्या माध्यमातुन महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांची समाजामध्ये प्रतिमा खराब करण्याच्या उद्देशाने राजकीय सुडबुद्धीने त्यांची प्रतिमा मलीन करण्याचे कार्य करण्यात येत आहे. तसेच आमदार नाना पटोले यांच्यावर खोटे आरोप करुण राजकीय वातावरण व भांडण तंटे निर्माण होतील अशा प्रकारचे कृत्य फेसबुक व व्हॉटस्टप ग्रुपच्या माध्यमातुन होत आहे. तरी शांतता व सुव्यवस्था कायम राहावी याकरीता सदर प्रकरणाची चौकशी करुन पोस्ट वायरल करणाºया आरोपीवर त्वरीत गुन्हे दाखल करण्यात यावे या आशयाचे निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी मिडीयाशी बोलतांना कॉंग्रेस शहराध्यक्ष दिलीप मासूरकर, डॉ. अजयराव तुमसरे व जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती मदन रामटेके यांनी म्हटले की, तातडीने दोषींवर गुन्हे दाखल करून कारवाई करावी अन्यथा कॉग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आम्ही देत आहोत. निवेदन सादर करतेवेळी साकोली जिल्हा परिषद सभापती मदन रामटेके कॉंग्रेस कमिटी शहर अध्यक्ष दिलीप मासूरकर , डॉ. अजयराव तुमसरे, शहर उपाध्यक्ष दिलीप निनावे, साकोली कॉंग्रेस कमिटी पदाधिकारी सतिश रंगारी, नेपाल कापगते, दिपक थानथराटे, विनायक देशमुख, विशाल गजभिये, महासचिव विजय साखरे, आकाश मेश्राम, उमेश भेंडारकर, आनंद नागोसे, सुरज डुंभरे, सचिन राऊत, रविंद्र पंचभाई, झनकलाल लांजेवार, लालचंद लोथे, डॉ. दिपक मेंढे, कुलदीप नंदेश्वर व अनेक कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.