भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : हिंदी चित्रपट नायक मध्ये अभिनेता अनिलकपूर एक दिवसाचा मुख्यमंत्री बनतो अर्थात जवाबदारी स्वीकारतो. जबाबदारी स्वीकारताना हिम्मत लागते. अशीच हिम्मत दाखविली आणि धाडस करणारी मोहाडी येथील इंदिरागांधी वार्डतील बापू गभने यांची नातीन कु.ट्विंकल मंदा भेंडे हिचा जन्म दि.२३ मे २०१० मध्ये असून शिक्षकदिनी ती १४ वर्षे ३ महिने १३ दिवसाची असताना प्राचार्यपदाची भूमिकेची जबाबदारी स्वीकारली. तिच्या प्राचार्यपदाच्या भूमिकेमुळे शिक्षक आणि शिक्षिकामध्ये कौतुकाचा वर्षाव होत आहे.
श्री.सुदामा शिक्षण संस्थाद्वारा संचालित स्व. सुलोचनादेवी पारधी विद्यालय व सुदामा कनिष्ठ महाविद्यालय मोहाडी येथे गुरुवार दि.५ सप्टेंबर २०२४ ला दुपारी ३ वाजता श्री चक्रधर स्वामी जयंती व भारताचे दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात आली. प्रथमता विद्यालयाच्या प्राचार्या किरण देशमुख व सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन व चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण केले. त्यानंतर सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.त्यानंतर वर्ग सातवीच्या विद्यार्थिनींनी आर्या नंदरधने, अनन्या देशमुख व हर्षा बुराडे यांनी शिक्ष्- ाक दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी शिक्षक हेमंत लोंदासे यांनी श्री चक्रधर स्वामी जीवन चरित्र सांगून त्यांनी रचलेला लीळाचरित्र हा मराठीचा प्रथम ग्रंथ होय असे विद्यार्थ्यांना प्रास्ताविकातून सांगितले यानंतर स्वयंशासन हा उपक्रम विद्यालयात राबविण्यात आला. या उपक्रमात एकूण ३५ विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी भाग घेतला व शाळेचे प्रशासन विद्यार्थ्यांनी सांभाळले. प्राचार्यच्या भूमिकेत ट्विंकल भेंडे, उपप्राचार्य मोनीश सुरजजोशी पर्यवेक्षिका हिमांशी डुंबरे यांनी जवाबदारी सांभाळली. शिक्षकामध्ये प्रथम क्रमांक वर्ग १० अ चा विद्यार्थी विपुल झंझाड तर द्वितीय क्रमांक वर्ग ९ अ ची विद्यार्थिनी शारूण भोंडे व तृतीय क्रमांक प्रिन्सि दमाहे यांनी पटकाविले.विद्यार्थ्यांचे पर्यवेक्षक विनय शिवरकर, विनोद ढगे, शिक्षिका रेखा चकोले, कुंदा तितीरमारे यांनी केले.
या विद्यालयात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाचे पाहणी करण्यासाठी पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी कवीश्वर खोब्रागडे, शिक्षण विस्तार अधिकारी आदमने, विस्तार अधिकारी कुकडकर यांचे ११ वाजता गेटवर बॅच बिल्ले लावून त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर पुष्पगुच्छाने आॅफिसमध्ये स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी आपल्या तपासणीला सुरुवात केली. विद्यालयातील भौतिक सुविधा, उपक्रम शैक्षणिक साहित्य, ग्रंथालय,डिजिटल रूम, शालेय पोषण आहार, प्रयोगशाळा, परसबाग, स्वच्छतागृह व वर्ग सजावट यांची त्यांनी पाहणी केली. प्राचार्य व उप्राचार्य यांनी भूमिका वठविल्याबद्दल त्यांचे सुद्धा त्यांनी पुष्प देऊन स्वागत केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य किरण देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले व सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमास शिक्षक संजीव डोंगरे, प्रकाश मते, गोपाल दादगाये, शरद मालोदे, प्रकाश सिंगनजुडे, उमेश कडव तसेच शिक्षिका हितेश्वरी पटले नम्रता कुंभलकर, शिक्षकेत्तर कर्मचारी चुनीलाल आगाशे, नरेश ऊईके यांनी सहकार्य केले.