तुमसर शहराची होणार सात गावांच्या सीमेलगत हद्दवाढ!

भंडारा पत्रिका/जीवन वनवे तुमसर : नगर परिषद हद्दीतील शहराची हद्दवाढ होण्याकरिता सन २०२१ पासून शासनाकडे प्रस्ताव पडून होता. मात्र हद्दवाढ झाली नव्हती आमदार कारेमोरे यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंधाने मुख्यमंत्र्यांची प्रस्तावावर स्वाक्षरी मिळवली व महाराष्ट्र राज्याचे राज्यपालांच्या आदेशानुसार नगर विकास विभागाचे उपसचिव अनिरुद्ध जेवळीकर यांनी शुक्रवारी शासन निर्णय काढला व उदघोषणा प्रसिद्ध झाली. नगर परिषद तुमसर ही ब वर्ग नगर परिषद असून मौजा तुमसर पैकी काही क्षेत्र नगर परिषद तुमसर हद्दीत समाविष्ट नव्हते.

सध्या नगर परिषद चे क्षेत्रफळ ७.५६ चौ. की.मी असून हद्दवाढ मुळे १४.४२ चौ.की.मी क्षेत्र विस्तार होईल. सदर प्रस्ताव सन २०२१ पासून प्रलंबित होता. आमदार राजू कारेमोरे यांनी दिलेल्या सूचना नुसार मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्या बाबत आमदारांनी सातत्याने पाठपुरावा करून मंत्रालयातून सदर प्रस्ताव यशस्वीपणे काढलेला असून सदर प्रस्तावाची उद्घोषणा प्रसिद्ध झाली आहे.

या हद्दवाढ मुळे नगर परिषद हद्दी जवळील विकसित झालेल्या भागातील अभिन्यास विकसित करण्यास तसेच इतर पायाभूत सुविधा मीळण्याची संधी मिळेल शिवाय नागरी सुविधा विकसित करण्यासाठी हद्दवाढ योजनेअंतर्गत अनुदान उपलब्ध होईल. डोंगरला येथील स्मशानभूमी नगर परिषद हद्दीत येईल तर उत्तरेस मौजा पिपरा, झारली, पूर्वेस मौजा येरली, डोंगरला, बोरी कोष्टी, नवरगाव, दक्षिणेस मौजा सिवनी, तुडका, तामसवाडी, मांगली पश्चिमेस हसारा, मेहगाव या गावांच्या सीमेलगत असलेले तुमसर गट क्षेत्र नगर परिषदेच्या हद्दीत समाविष्ट होतील. त्यामुळे शहराचे क्षेत्र दुप्पट होईल. एकंदरीत शहराच्या विकासा करिता सदर प्रस्ताव अत्यंत महत्त्वपूर्ण असून आमदार राजू कारेमोरे यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. या हद्दीवाढीमुळे आता तुमसरकरामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर आता शहराच्या विकासासाठी पाचशे कोटी रुपये मिळणार हे मात्र नक्की.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *