भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : चितारओळीचे गणपती पूर्ण भारतभर प्रसिद्ध आहेत. गेल्या १०० वर्षांपासून येथे गणेश निर्मितीचे काम सुरू आहे. येथील गणेश मूर्ती विशेष करून दक्षिणा भारताच्या तामीळनाडू आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ राज्यातील बहुतांशी राजधानी शहरात मोठी मागणी आहे. सुमारे १० ते १५ फूट उंचीच्या गणेशमूर्ती या शहरात रेल्वेद्वारे पाठविल्या जातात. ने-आणची जबाबदारी मध्यस्थ एजंटाद्वारे असते. त्यासाठी विमा देखील उतरविला जातो. काही मोठ्या मूर्त्या रस्त्यांद्वारे देखील पाठविल्या जातात. नागपूरच्या मध्य व दक्षिणा रेल्वेच्या जनसंपर्क विभागाद्वारे प्रतिनिधी चौरसियांना मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवार ५ सप्टेंबरपर्यंत या विविध शहरांना ७१ मूर्त्या पाठ- विण्यात आल्या आहेत. त्यातून रेल्वेला २५ हजार रुपयाचा महसूल मिळाला आहे.