भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : महाराष्ट्र राज्यातील भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दि. १ सप्टेंबर रोजी श्रीरामपुर अहमदनगर जिल्हा येथे एका जनसभेत मुस्लिम समाजाबद्दल अपशब्द वापर करुन म्हणाले की, आमच्या रामगिरी महाराजाच्या विरूद्ध काही बोललात तर तुमच्या मशीदीत अंदर घुसून निवडूनिवडू मारू असे आक्षेपार्य वक्तव्य करून शांतताप्रिय महाराष्ट्रात हिंदु मुस्लिम या सौख्याने नांदत असलेल्या दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच या दोन समाजात असे विषासारखे शब्द पेरून जातील दंगली भडकविण्याचा यांचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती मुस्लिम जगात गोंदियाचे माजी नगरसेवक मो. खालीद युसुफ पठाण यांनी ६ सप्टेंबर रोजी गोंदिया येथील शासकिय विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत केले. या प्रसंगी मुस्लिम जमात चे अहमद मनियार, मकसूदगाई, माजी नगरसेवक शकील मंसूरी, ईशानभाई, जावेद खान आदि सह सैंकडोच्या संख्येने मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते. या संदर्भात पुढील माहिती देत खालीद पठाण म्हणाले की, गेल्या कित्येक वर्षापासून गोंदिया सारख्या शांतताप्रिय शहरात आम्ही सर्वजण हिंदू मुस्लिम बांधव सौख्याने नांदतो आहे.
एकमेकांच्या सणासुदीत एकमेकांना शुभेच्छा देतो, एकमेकांच्या सुखदुखात सहभागी होतो. तसेच आम्ही मुस्लिम बांधव फुले- शाहू- बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या मार्गाने चालणारे माननारे आहोत पण कुणी उपटसुंभ आमच्या मोहम्मद पैगंबर विरूद्ध काही बोलेल आणि त्यांच्या मागे आमदार नितेश राणे सारखे देढ फुटया राहून आमच्या समाजाला सर्रास मशीदीत घुसून मारण्याची भाषा करत असेल तर त्याला महाराष्ट्र शासनाने त्याविरूद्ध एफ.आय.आर. दाखल करून त्याला अटक करावी अशी आमची मागणी आहे. या संदर्भात निवेदन गोंदिया जिल्हाधिकारी, केंद्रिय गृहमंत्री भारत सरकार, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री गोंदिया जिल्हा, पोलिस अधीक्षक गोंदिया यांना देण्यात आला आहे. तसेच पुढील १५ दिवसात यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली नाही तर गोंदिया जिल्हयातील समस्त मुस्लिम जमात आणि त्या सोबत असलेले सर्व संगठन आपल्या घरातील महिलां आणि मुलां सोबत धरणे आंदोलन करणार असा इशारा शासनाला देण्यात आला आहे.