वैद्यकीय महाविद्यालय रद्द झाले नाही

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : गेल्या काही दिवसात भंडारा येथील वैद्यकीय महाविद्यालयाची मान्यता रद्द झाली असल्याचा दूषप्रचार केला जात आहे. जेव्हा की या महाविद्यालया करिता ४०३ कोटीच्या निधीला मंजूरी मिळाली असून याची पुढील प्रक्रिया संबंधित विभागाद्वारे युद्ध स्तरावर सुरू आहे. नॅशनल मेडिकल कॉन्सिलच्या टिम द्वारे तपासणी दरम्यान काही त्रुटया काढल्या आहे. या संदर्भात आम. नरेंद्र भोंडेकर यांनी पुढाकार घेत राज्याचे वैदकीय शिक्षण सचिव दिनेश वाघमारे यांच्याशी चर्चा केली आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावात झालेल्या त्रुटया दुरुस्ती करून पुनर्तपासणी लावण्यास नेशनल मेडिकल कॉन्सील दिल्ली कडे विनंती करावयाचे निवेदन केले.

या संदर्भात आम. नरेंद्र भोंडेकर यांनी एका पत्रका द्वारे माहिती दिली आहे की, त्यांनी भंडारा वैद्यकीय महाविद्यालय संदर्भात राज्याचे वैदकीय शिक्षण सचिव दिनेश वाघमारे यांच्याशी चर्चा केली. यात अशी माहिती समोर आली की वैद्यकीय महाविद्यालय भंडारा तर्फे २०२३-२४ या वर्षा करिता नॅशनल मेडिकल कॉन्सील दिल्ली कड़े अर्ज करण्यात आले होते. या अर्जावर निर्णय घेत दिल्ली येथून मेडिकल कॉन्सिलची एक टिम तपासणी करिता पाठविण्यात आली होती. या टीम द्वारे झालेल्या तपासणीत काही त्रुट्या असल्याचे आढळून आले. ज्या मुळे मेडिकल कॉन्सिल ने त्रुटया पूर्ण करण्याची सूचना केली आणि प्रस्तावात दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले. महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रस्तावांपैकी १० प्रस्तावात मेडिकल कॉन्सिल द्वारा त्रुटया काढण्यात आल्या आहे. या पैकी एक भंडारा जिल्ह्यातील महाविद्यालय आहे.

सोबतच प्रस्तावात त्रुटया निघणे ही कार्यालयीन जवाबदारी असून त्यात दुरुस्तीचा प्रवधान सुद्धा आहे आणि यात लवकरात लवकर दुरुस्ती करून प्रस्ताव पुन्हा सादर करण्याची विनंती करण्यात आली आहे. केवळ भंडाराच नव्हे तर या प्रकारच्या त्रुटया अन्य जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावात ही निघाल्या होत्या ज्यात दुरुस्ती केल्या नंतर आज त्यांचे अभ्यासक्रम सुरळीत सुरू आहे. भंडारा वैद्यकीय महाविद्यालया करिता ४०३ कोटींचा निधी मंजूर झाला असून याचे काम सुद्धा सुरू झाले असल्याची माहिती वैदकीय शिक्षण सचिव दिनेश वाघमारे यांनी चर्चे दरम्यान आम. नरेंद्र भोंडेकर यांना दिली. या चर्चे दरम्यान आम. भोंडेकर यांनी प्रस्तावात झालेल्या त्रुटयांची संपूर्ण माहिती जाणून घेतली. सोबतच त्यांनी वैदकीय शिक्षण सचिव दिनेश वाघमारे यांना विनंती केली की, प्रस्तावातील झालेल्या त्रुटया लवकरात लवकर पूर्ण करून या संदर्भात नेशनल मेडिकल कॉन्सील दिल्ली कडे पुनर्तपासणीची विनंती करावी.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *