भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तुमसर शहरात पाणीपुरवठा योजने अंतर्गत पाईपलाईन टाकण्यासाठी तहसील कार्यालय रोडवरील मुख्य सिमेंट काँक्रीट रस्ता अगदी मधोमध खोदकाम करण्यात आले. संबंधित कंत्राटदाराकडून शहरातील पुन्हा चांगले रस्ते फोडण्यात आले. त्यामुळे नागरिकांना याचा वाहतुकी दरम्यान मोठा त्रास होत आहे.