भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करीत २५ लाख रुपए किंमतीच्या १६७ किलो गांजा जप्त करीत दोन आरोपींना ताब्यात घेतले.सदर गांजा हा उडीसा राज्यातुन महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात वाहतुक केला जात असल्याची माहिती आरोपींनी पोलीसांना दिली.पोलीसांनी यावेळी गांजा व एक चारचाकी वाहन असा एकुण मिळुन ४५ लाख ६ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास भंडारा उपविभागीय अधिकारी डॉ.अशोक बागुल हे करीत आहेत. उडीसा इथुन भंडारामार्गे एका ग्रे रंगाच्या चारचाकी वाहनांमध्ये गांजा ची वाहतुक केली जात असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्याआधारे भंडारा पोलीस स्टेशनचे पो.नि गोकुळ सुर्यवंशी यांनी एक पथक नेमुण नागपूर राष्ट्रीय महामार्गावर ग्रे रंगाच्या चारचाकी वाहनाचा शोध घेतला असता ग्रे रंगाची महीन्द्रा झायलो ५०० हे चारचाकी वाहन भंडारा शहरातील बीटीबी मार्केट पर- ीसरातील यार्ड मध्ये पार्कींग केल्याचे दिसुन आले.
पोलीसांना सदर वाहनामध्ये दोन ईसम मिळुन आल्याने पोलीसांनी त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव सुमित सुभाष धोरवे, वय ३३ वर्षे, रा. आळंदी देवाची ता.खेड जिल्हा पुणे व रविंद्र कृष्णा शिंदे वय ३६ वर्षे, गंगापुर रोड शिवश्रृष्टी कॉलनी नाशिक ता.जिल्हा नाशिक असे सांगितले. पोलीसांना दोन्ही ईसमांवर संशय आल्याने पोलीसांनी सदर गाडीची तपासणी केली असता गाडीचे मागील भागात एकुन ७ पांढºया रंगाचे प्लास्टीक बोरी (चुंगडी) दिसुन आले. उपस्थित पथकातील पोलीसांनी सदर प्रकरणाची माहीती जिल्हा पोलीस अधिक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे व भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अशोक बागुल यांना देण्यात आली. वरीष्ठांच्या सुचनेप्रमाणे पोलीसांनी सदर ग्रे रंगाची महीन्द्रा झायलो ५०० क्रमांक एम.एच.१५ ई.पी-४३७२ मधील प्लास्टीक बोरी (चुंगडी) ची तपासणी केली असता त्यामध्ये गांजा असल्याचे पोलीसांना दिसुन आले.
पोलीसांनी आरोपींना गांजा वाहतुकीबाबत विचारणा केली असता त्यांनी सदरचा गांजा हा नामे तुषार भोसले, रा. आडगांव शिवार नाशिक व सुरज नावाचा ईसम रा. नाशिक यांच्या सुचनेनुसार सदरचा गांजा हा ओरीसा राज्यामधुन आणला असुन नाशिक येथे घेऊन जात असल्याचे सांगितले. मिळुन आलेल्या गांजाचे इलेक्ट्रॉनिक वजन काटयावर मोजमाप केले असता सदर गांजाचे एकुण वजन १६७.१०० कि.ग्रॅ असल्याचे निष्पन्न झाले. बाजार भावानुसार सदर गांजाची किंमत २५ लाख ६ हजार ५०० रुपए एवढी सांगण्यात येत आहे. पोलीसांनी गांजा व वाहन असा एकुण मिळुन ४५ लाख ६ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्येमाल जप्त केला. सदर प्रकरणी पोलीस स्टेशन भंडारा येथे अप क्र ८७३/२४ कलम ८, २०, २९ एन.डी.पी.एस. कायदा सन १९८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास डॉ. अशोक बागुल उपविभागिय पोलीस अधिकारी भंडारा हे करीत आहेत.