भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : गोंदिया जिल्हा शल्य चिकित्सक अमरीश मोहबे यांनी गेल्या ३ वर्षांपासून विविध भ्रष्ट कामात गुंतलेले आहेत, ज्याची विविध तपास समित्यांनी चौकशी केली आहे आणि काही तपासात ते दोषी देखील आढळले आहेत त्यांच्या विरोधात अजून. नागपूरच्या उपसंचालक डॉ. कांचन वानेरे त्यांच्या कामाबद्दल ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे आपणास विनंती आहे की, डॉ. अमरीश मोहबे यांना त्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल लवकरात लवकर निलंबित करा. डॉक्टर नितेश बाजपाई यांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. मोहबे यांनी खालील भ्रष्टाचार केला आहे. त्यात १९ मृत व्यक्तींना फिटनेस प्रमाणपत्र देणे. बेकायदेशीर गर्भपात केंद्र मंजूर करणे. बेकायदेशीर नर्सिंग होमला मान्यता देणे, जिल्ह्यातील सर्व रुग्णालयां कडून मनमानी पद्धतीने पैसे वसूल करणे आणि पैसे न भरल्यास जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांचे कामकाज बंद करणे, अवैध सोनोग्राफी केंद्रांना मान्यता. सरकारी रुग्णालयात कार्यरत डॉक्टर व इतर कर्मचाºयांकडून पगाराच्या नावाखाली खंडणी, याशिवाय सीएस मोहबे यांनी अनेक भ्रष्टाचार केला आहे. मोहबे यांच्या सर्व भ्रष्टाचाराचे पुरावे आरोग्य विभागाला देण्यात आले असून काही तपास समित्यांनीही त्याची चौकशी केली आहे. याशिवाय गोंदिया जिल्ह्यातील विविध वृत्तपत्रांमध्ये ५० हून अधिक वेळा हा विषय प्रसिद्ध झाल्याने आरोग्य विभागाची प्रतिमा डागाळली आहे, त्यासाठी मोहबे सारख्या भ्रष्ट अधिकाºयावर कारवाई होणे गरजेचे आहे. या सर्व प्रकारावर आपण अमरीश मोहबे यांना तात्काळ पदावरून हटवून निलंबित करावे अशी मागणी गोंदिया जिल्हाधिकारी यांना केली आहे.