तत्कालीन मुख्यधिकारी सिध्दार्थ मेश्राम यांची बदली रद्द करा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : स्थानिक नगर परिषद तुमसर येथील तात्कालिन मुख्यधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांची दिनांक २ सप्टेंबर ला नगर विकास विभागाने बदली केली असून त्यांच्या ठिकाणी रिक्त झालेल्या पदाचा कार्यभार करिश्मा वैद्य यांना देण्यात आला आहे. वैद्य यांच्यावर अमरावती तील भातकुली नगर पंचायतच्या मुख्याधिकारी असताना शिलाई मशीन प्रशिक्षण आणि गारमेंटचा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणाºया नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी मुख्याधिकारी करिश्मा वैद्य यांनी पन्नास हजाराची लाच मागितली होती. यात वीस हजार रुपये स्वीकारताना लाचलूचपत विभागाने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार मुख्याधिकारी करिश्मा वैद्य यांना रंगेहाथ पकडले होते. व त्यांना अटक सुद्धा करण्यात आली होती. त्यामुळे अश्या भ्रष्टाचारी मुख्यधिकारी करिश्मा वैद्य यांना तुमसर नगर परिषदचे कार्यभार दिल्याने तुमसर नगर परिषदेत सुद्धा भ्रष्टाचार होण्याची संभावना आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदल्यांसाठी जे नियम ठरवून दिले आहेत त्याचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे मुख्यधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांची बदली रद्द करून त्यांना त्याच तुमसर नगर परिषदेत पदोन्नती देण्यात यावी अश्या मागणीचे निवेदन भीम आर्मी ने मुख्यमंत्र्यासह शासनाला दिले आहे. तुमसर शहरात पारदर्शकपणे काम करणारे अधिकारी म्हणून सिद्धार्थ मेश्राम यांचा नावलौकिक झाला आहे. शिस्तप्रिय व कर्तव्यदक्ष अशी ओळख असण्याबरोबरच आपल्या कार्यशैलीने सर्वसामान्य जनतेचा भक्कम पाठिंबा मिळवण्यात यशस्वी ठरलेले सिद्धार्थ मेश्राम यांची नगरपालिकेच्या मुख्यधिकारी पदावरूनची सोमवारी तडकाफडकी बदली करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. येथे चांगले कामे करूनही मेश्राम यांची बदली करण्यात आल्याने सर्वसामान्य तुमसर करांनी सतापं व्यक्त केला आहे.

मेश्राम यांची बदली मागे घेण्यात यावी. तसेच २ सप्टेंबर ला नगर परिषद गेटवर आवारात फटाके फोडून शासकीय कामात अडथडा निर्माण करणाºया त्या अज्ञात असामाजिक तत्वातील लोकांवर फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी. अश्या आशयाचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांना दिले आहे. या संदर्भात चौकशी केल्यावर नगर परिषदेची सीसीटिव्ही फुटेज मधे सर्व दिसून येईल. या सर्व बाबींचा विचार करुन संबधिताना तात्काळ अटक करण्यात यावी. अन्यथा भीम आर्मी तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल व याची सर्व जवाबदारी प्रशासनाची राहील असे निवेदन भीम आर्मीचे तालुका अध्यक्ष रजनेश बन्सोड यांनी राज्याचे मुख्य निवडणूक आयोग, मुख्यमंत्री, अपर सचिव नगर विकास मंत्रालय मुंबई यांना दिले असून त्याची प्रतिलिपी आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन संचालनालय मुंबई, विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक नागपूर, जिल्हाधिकारी भंडारा यांना दिली आहे. तसेच भीम आर्मी चीफ खा. चंद्रशेखर आझाद यांना निवेदनकर्त्याने व्हाट्सअप द्वारे निवेदन पाठविले, त्यांनी त्यावर तात्काळ दखल घेण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *