तिरोडा उपजिल्हा रुग्णालयातील बालरोगतज्ञ महिला डॉक्टरची कौतुकास्पद कामगिरी

भंडारा पत्रिका/रमाकांत खोब्रागडे तिरोडा : उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे बाळंतपणा करता दाखल झालेले महिलेचे प्रथम बाळंतपण सिझर झाल्याने दुसरेही बाळंतपण सिझरच होईल असा समज असतांनाच तिरोडा उप जिल्हा रुग्णालयातिल महिला बालरोग तज्ञ डॉक्टरने आपले कौशल्य पणाला लावून सहकारी कर्मचाºयांचे मदतीने नॉर्मल बाळंतपण केल्याने या महिला डॉक्टरचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पुढील उपचाराकरिता गोंदिया येथे रवाना अशी ख्याती प्राप्त असलेले उपजिल्हा रुग्णालयात दिनांक ७ सप्टेंबर रोजी सकाळी ९.१५ दरम्यान बेलाटी खुर्द येथील मनीषा विनोद पटले (२६ वर्षे), राहणार बेलाटी खुर्द हि महिला दुसरे बाळंतपणा करिता दाखल झाली असता या महिलेचे दोन वर्षाआधी पहिले बाळंतपण गोंदिया येथील खाजगी रुग्णालयात झाल्याने तेथील डॉक्टरांनी या महिलेस व तिचे परिवारास पुढील बाळंतपणही सिझर होईल असे सांगितल्याने महिलेचे परिवारास व महिलेस सिझर करावे लागेल असा समज झाला असतानाही येथील कर्तव्यावर असलेल्या महिला बालरोग तज्ञ स्नेहा तिरपुडे यांनी या महिलेची तपासणी केली असता त्यांना महिलेचे स्वाभाविक बाळंतपण करणे शक्य असल्याचे लक्षात आल्याबद्दल तसेच महिलेस बाळंतपणा करिता गोंदियास पाठवले असता मध्ये काही अडचण निर्माण झाल्यास बाळ व बाळाचे आईस धोका होण्याची शक्यता असल्याने त्यांनी रुग्णालयाचे अधिक्षक राहुल शेंडे यांना या गोष्टीची कल्पना देऊन आपण या महिलेचे नैसर्गिक बाळंतपण करू शकतो असा विश्वास दिल्याने अधीक्षक शेंडे यांचे परवानगीने डॉक्टर स्नेहा तिरपुडे यांनी रुग्णालयात उपस्थित परिचारिका संगीता बनसोड, शुभांगी हट- वार, स्वाती नारनवरे, कुंदा सहारे व कंत्राटी मदतनीस यांचे सहाय्याने या महिलेचे नैसर्गिक बाळंतपण केले. या महिलेस प्रथम बाळ मुलगा असून याही वेळी २ किलो ८०० ग्रामचा मुलगा झाल्याने तसेच बाळ व बाळंतीण सुखरूप असून प्रथम बाळंतपण सिझरने झाल्याने दुसरेही बाळंतपण सिझर होईल हा समज खोटा ठरत असल्याचे दिसून आले. या कार्यामुळे तिरोडा येथील बालरोगतज्ञ महिला डॉक्टर स्नेहा तिरपुडे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *