‘मुख्यमंत्री योजनादूत’ होवू या; दरमहा १० हजार मानधन मिळवूया!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी १३ सप्टेंबरपर्यंत www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करावयाची आहे. राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची ६ महिन्यांसाठी निवड केली जाणार असून या योजनादूतांना दरमहा १० हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. भंडारा जिल्ह्यासाठी एकूण ६४० योजनादूतांची ६ महिन्यांसाठी निवड केली जाणार असून आज रविवारी सकाळ पर्यंत ३२८ उमेदवारांची नोंदणी झाली आहे. राज्य शासनाचे माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय हे शासन आणि जनता यांच्यामधील दुवा समजले जाते. शासकीय योजना, उपक्रम, शासन निर्णय व शासकीय कार्यक्रमांची प्रसिद्धी जिल्हा माहिती कार्यालयांच्या माध्यमातून महासंचालनालय प्रभावीपणे करत असते. शासकीय योजनांचा लाभ राज्यातील अधिकाधिक नागरिकांना होण्याच्या उद्देशाने शासकीय योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने राज्यभरात मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *