आ. विनोद अग्रवाल यांच्या कार्यालयासमोर गोंड गोवारी जमातीचा घेराव

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- गेल्या ७० वर्षापासून शासनाच्या अन्यायाकारी विविध धोरणाबाबत गोंड गोवारी जमातीचे अनेक दिवसांपासून लोकशाही व संविधानिक मार्गाने आंदोलने सुरू आहेत. न्याय मागणीसाठी सुरू असलेल्या लढ्यात शासन केवळ चाल ढकल धोरण आखत असून समाजाला न्याया पासून वंचित ठेवत असल्याचं ठपका ठेवत रविवार ८ सप्टेंबर रोजी गोंड गोवारी समाजाच्या शेकडो च्या संख्येत लोकांनी गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांच्या कार्यालया समोर घेराव केला व निवेदन सादर केले.सविस्तर असे की,२६ जानेवारी २०२४ रोजी आदिवासी संविधानिक गोंड गोवारी संघर्ष कृती समिती महाराष्ट्र तर्फे नागपूर येथील संविधान चौकात १७ दिवस आमरण उपोषण करण्यात आले होते. दरम्यान दिनांक १०/०२/ २४ रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील सहयाद्री गृहावर बैठक होऊन गोंड गोवारी जमातीच्या संविधानिक अभ्यास करण्यासाठी सेवा निवृत्त न्यायाधिस के एल वळणे यांचे अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करून सहा महिन्यांच्या आत सकारात्मक अहवाल शासनास सादर करण्यास कळविले होते.

मात्र सदर समितीने ६ महिने लोटून सुद्धा अहवाल सादर न केल्याने आदिवासी गोंड गोवारी जमात सविंधानीक हक्क संघर्ष कृती समिती मार्फत ४/९/२०२४ रोजी पुन्हा नागपूर येथील संविधानिक चौकात एक दिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. सदर आंदोलनादरम्यान शासनाकडून नियोजित कालावधीत अहवाल संबंधात कार्यवाही व्हावी अशी मागणी करत आव्हान देण्यात आले होते की, जर ६ तारखेला सकारात्मक अहवाल न मिळाल्यास ७ तारखेपासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला. मात्र आदिवासी विभाग यांनी पुन्हा षडयंत्र करून दिनांक ६/०९/२०२४ रोजी अचानक के एल वळणे समितीला अहवाल सादर करण्यास दोन महिन्याचा अवधी देण्यासंदर्भात शासन निर्णय काढल्याने आदिवासी संविधानिक गोंड गोवारी जमातीमध्ये पुन्हा असंतोष पसरला, त्यामुळे गोंदिया विधानसभेचे आमदार यांच्या कार्यालय व घरासमोर जाऊन गोंदिया तालुक्यातील गोंड गोवारी बांधव जाऊन आमदार यांना घेराव घातला व घडलेल्या प्रकाराबाबत जाब विचारला.

यावेळी शासन निर्णय जाळून आमदाराच्या समोर होळी करण्यात आली व महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध करण्यात आला. या घेराव चे नेतृत्वआदिवासी गोंड गोवारी समाजाचे अध्यक्ष सु- शील राऊत यांनी केले. याप्रसंगी गोंड गोवारी समाज कृती समितीचे प्रमुख पदाधिकारी के. के. नेवारे, मुनेश्वर ठाकरे, कृष्णा फुन्ने, रेखलाल राऊत, शिवलाल नेवारे, शेखर शहारे, राजकुमार राऊत, अशोक बोपचे, विजय नेवारे, प्रेमलाल शहारे, सुनिल भोयर, शितल चौधरी, आशा चौधरी, कला राऊत, अनिता भोयरे, यमुना भोयर गुलाब नेवारे, प्रमोद सहारे, प्रवीण चौधरी, संजय राऊत, यांच्यासह सालेकसा, गोरेगाव, तिरोडा तालुक्यातील गोंड गोवारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *