रानडुक्करांच्या हल्ल्यात इसम जखमी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- वन परिक्षेत्र अड्याळ चे अधिनस्त सहवनक्षेत्र किटाडी अंतर्गत असलेल्या वनरक्षक बीट देवरी, नियतक्षेत्र वाकल येथील राखीव वन कक्ष क्रमांक ३०१ मध्ये सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या इसमावर रानडुक्कराच्या कळपाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना शनिवार (ता.७ ) ला सकाळी ११:३० ते १२:०० वाजता दरम्यान घडली. दुधराम सखाराम बनकर(५१) रा. वाकल, तालुका लाखनी असे जखमी इसमाचे नाव आहे. त्याचेवर जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याचे क्षेत्र सहाय्यक मुकेश श्यामकुवर यांनी सांगितले. सहवनक्षेत्र किटाडी पुरातन मोठ्या झाडाचे वनक्षेत्र म्हणून ख्यातीप्राप्त असून यात हिंस्त्र श्र्वापदांसह तृणभक्षी प्राणी, सरपटणारे प्राणी, रंगीबेरंगी फुलपाखरे या शिवाय मौल्यवान इमारती लाकूड, फळझाडे व आयुर्वेदिक वनस्पती ह्या वनक्षेत्राचे वैभव आहे.

वनरक्षक बीट देवरी नियतक्षेत्र वाकल येथील राखीव वन कक्ष क्रमांक ३०१ मध्ये दुधराम बनकर सकाळी ११:३० वाजता दरम्यान सरपण गोळा करीत असताना अचानक रानडुक्कराचे कळपाने त्याचेवर हल्ला करून जखमी केले. ही बाब आजूबाजूला असलेल्या गावकºयांचे निदर्शनास आल्याने आरडाओरड केल्याने रानडुक्कर पळून गेले. घटनेची माहिती वनरक्षक नितीन पारधी व क्षेत्र सहाय्यक मुकेश श्यामकुवर तसेच कुटुंबीयांना देण्यात आली. कुटुंबीयांनी गावकºयांचे सहकार्याने जखमी दूधराम याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय पालांदूर येथे नेण्यात आले. जखमीची प्रकृती अत्यवस्थ असल्याने प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालय भंडारा येथे पाठविण्यात आले. क्षेत्र सहाय्यक मुकेश श्यामकुवर यांनी दवाखान्यात जाऊन जखमीसह नातेवाईकांची आस्थेने विचारपूस केली. तथा आवश्यकता भासल्यास वन विभागाकडून आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले. या घटनेमुळे वाकल आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसामुळे वनक्षेत्र घनदाट झाल्याने एकट्या-दुकट्याने वनक्षेत्रात प्रवेश करू नये. असे वन विभागाने गावकºयांना आवाहन केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *