निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाविना मुख्याधिकाºयांना न.प.चा पदभार स्विकारण्याची लगीनघाई ?

जीवन वनवे / भंडारा पत्रिका तुमसर : स्थानिक नगर परिषदेचे तत्कालीन मुख्यधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांची बदली २ सप्टेंबर ला नगर विकास विभागाने केली व करिश्मा वैद्य यांना पालिकेचे कार्यभार देण्याचे आदेश दिले मात्र त्यांना रुजू होण्याकरिता जिल्हाधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक असते. महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियमानुसार सन २०२४ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक ६. नुसार महाराष्ट्र शासकीय कर्मचा-यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाºया विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश आणि ज्याअर्थी, यात यापूढे दिलेल्या प्रयोजनांकरिता महाराष्ट्र शासकीय कर्मचाºयाच्या बदल्याचे विनियमन २००६ आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाºया विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ करण्यासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे त्याआधी, आता भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१३ च्या खंड (१) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्राचे राज्यपाल, याद्वारे, ज्या अध्यादेशास महाराष्ट्र शासकीय कर्मचाºयांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाºया प्रतिबंध व सार्वत्रिक निवडणूका, २०२४ आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीमुळे, ज्या प्रकरणांमध्ये बदली करण्यात आलेली नाही.अशा प्रकरणांमध्ये, ३१ आॅगस्ट पर्यंत बदली करण्यात येईल असे नमूद आहे.

मात्र सिद्धार्थ मेश्राम यांची बदली निवडणूक आयोग व शासनाच्या नियमानुसार झाली नसून ती बदली २ सप्टेंबर ला झाली मात्र करिश्मा सतिशराव वैद्य, सहायक आयुक्त गट ब, जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया यांनी प्रशासकीय बदली नगर परिषद तुमसर, जि. भंडारा येथे मुख्याधिकारी या पदावर झाले असल्याचे पत्र जिल्हाधिकारी भंडारा यांना दि०२ सप्टेंबर २०२४ रोजी दिले.त्यावरतत्कालीन जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी करीश्मा वैद्य मुख्यधिकारी यांना पदावर रुजू होण्यासंदर्भात कोणतेही आदेश न देता तुमसर मुख्यधिकारी हे पद जिल्हा सहाय्यक निवडणूक अधिकाºयाचे असून निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन प्राप्त केल्याशिवाय तात्पुरता रुजू करून घेण्याविषयी निर्णय घेता येईल असे निवडणूक अयोगाला मार्गदर्शन मागविले असल्याचे सूत्रांद्वारे माहिती मिळाली आहे.मात्र करिश्मा वैद्य यांना तुमसर न.प मुख्यधिकारी पदाचा कार्यभार स्विकारण्याची लगिन घाई कसली?

असा सवाल येथे उपस्थित होत आहे. तर काही सामाजिक संघटनेच्या मार्फत त्यांच्यावर या आधी भ्रष्टाचार प्रतिबंधक अंतर्गत कारवाई झाल्याचे सुद्धा तक्रारी केल्या आहेत.आता निवडणूक आयोगाचा मार्गदर्शन न मागवता वैद्य यांनी कार्यभार स्वीकारला कसा ? या विषयी कारवाई होणार का? तर करिश्मा वैद्य यांच्याकडे गोंदिया जिल्यातील सहायक आयुक्त पद आमगाव, देवरी येथील मुख्यधिकारी हे कार्यभार आणि आता भंडारा जिल्ह्यातील तुमसर नगरपालिकेतील कार्यभार दिले असल्याने ते तुमसरात विकास कामे व नागरिकांचे कामे कसे करतील यावर प्रश्न निर्माण झाले आहे. तत्कालिन मुख्याधिकाºयाच्या काळात स्वयंभु कंत्राटदारांच्या गोटात स्मशान शांतता पसरली असतांना आत तेच पाढºया पोशाखाचे स्वयंभु कंत्राटदार सत्तेचे रुबाब दाखवत माजी सत्ताधारी मंडळीना हाताशी धरुन, विद्यमान मुख्यधिकाºयांचे स्वागत उत्सव साजरे करायला निघाले आहेत.म्हणजेच स्वागत करुन करून सोबत नगर परिषदची मलाई लाटु असा तर संदेश दिला नसावा?अशी खमंग चर्चा तुमसर शहरात दबक्या आवाजात सुरु आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *