भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भाजप आमदार नितीश राणे यांनी १ सप्टेंबर रोजी मुस्लिम समाजाविरोधात केलेल्या भडकाऊ भाषणाच्या निषेधार्थ भाजपा अल्पसंख्याक मोर्चातर्फे भंडारा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्यात आली. भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे भंडारा/गोदिया प्रभारी आबिद सिद्दीकी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे शेकडो मुस्लिम कार्यकर्ते व सामाजिक सेवा संस्थांमधील नागरिकांनी या एकत्र येत राज्याच्या जातीय सलोख्याला धक्का पोहोचविणाºया भाजप आमदार नितीश राणे यांच्या विधानाचा निषेध केला.यावेळी भाजप, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सय्यद शमशुल हक भाई, जिल्ह्य़ाचे अध्यक्ष हाजी दिम्मू शेख भाई, शहराध्यक्ष शोएब अन्सारी, जिल्ह्य़ाचे महामंत्री अतहर पटेल, फाजील पटेल, जिल्ह्य़ाचे उपाध्यक्ष इर्शाद खान, निघाट महेजाबीन खान व मोठय़ा संख्येने मंडळे उपस्थित होते. अधिकारी व हमीद शेख, जाहिद शेख, अझहर खान, मुज्जमील खान यांची प्रमुख उपस्थिती होती. भंडारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी उपस्थित नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन देत नियमानुसार कारवाई करण्याचे आश्वासन दिले.