भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : वीजचोरीविरोधात कठोर भुमिका घेत महावितरणच्या नागपूर परिमंडलाने आर्थिक वर्ष १ एप्रिल ते ३१ आॅगस्ट या पाच महिन्याच्या कालावधीत तब्बल २ हजार १३१ वीजचो-या उघडकीस आणल्या. यात बेकायदेशीर वीज वापर, वाढिव वीज भार आणि चुकीच्या वीज दराची १६०, वीज वाहिनीवर आकडा टाकून वीजचोरीची ९०७ तर वीज मीटर मध्ये फेरफार आणि अन्य प्रकारच्या थेट वीजचोरीच्या १ हजार ६४ प्रकरणांचा समावेश आहे. यात नागपूर जिल्ह्यातील १ हजार ६९५ तर वर्धा जिल्ह्यातील ४३६ विजचोºयांचा समावेश आहे.
या सर्व प्रकारातून झालेल्या वीजचोरीचे मुल्य तब्बल ३ कोटी ९४ लाख ६९ हजार असून पैशाचा भरणा न केलेल्या वीजचोरांविरोधात भारतीय विद्युत कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यात मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या नेतृत्वात महावितरणच्या नागपूर परिमंडलांतर्गत असलेल्या नागपूर शहर, नागपूर ग्रामिण आणि वर्धा मंडलात वीजचोरी विरोधात आक्रमक भूमिका घेत सातत्याने ठिकठिकाणी वीजचोरी विरोधात मोहीम राबविण्यात आली.
यात नागपूर शहर मंडलात बेकायदेशीर वीज वापर, वाढिव वीज भार आणि चुकीच्या वीज दराची ११०, वीज वाहिनीवर आकडा टाकून वीजचोरीची ५६६ तर वीज मीटर मध्ये फेरफार आणि अन्य प्रकारच्या थेट वीजचोरीच्या ४६५ प्रकरणांचा समावेश असून या वीजचोरीचे रक्कम तब्बल २ कोटी ४७ लाख ३९ हजार इतकी आहे. यापैकी ४६५ ग्राहकांवर तडजोडीपोटी १८ लाख ३७ हजारांचा दंड आकारण्यात आले. तर नागपूर ग्रामीण मंडलात बेकायदेशीर वीज वापर, वाढिव वीज भार आणि चुकीच्या वीज दराची २०, वीज वाहिनीवर आकडा टाकून वीजचोरीची २३९ तर वीज मीटर मध्ये फेरफार आणि अन्य प्रकारच्या थेट वीजचोरीच्या २९५ प्रकरणांचा समावेश असून या वीजचोरीचे रक्कम तब्बल ७४ लाख १३ हजार इतकी आहे. यापैकी २७५ ग्राहकांवर तडजोडीपोटी ९ लाख १७ हजा- रांचा दंड आकारण्यात आला आले.
नागपूर पाठोपाठ महावितरणने वर्धा जिल्ह्यात देखील वीजचोरांविरोधात कारवाईचा धडाका कायम ठेवीत वर्षभरात बेकायदेशीर वीज वापर, वाढिव वीज भार आणि चुकीच्या वीज दराची ३०, वीज वाहिनीवर आकडा टाकून वीजचोरीची १०२ तर वीज मीटर मध्ये फेरफार आणि अन्य प्रकारच्या थेट वीजचोरी ३०४ प्रकरणे उघडकीस आणली. या वीजचोरीचे रक्कम तब्बल ७३ लाख १६ हजार इतकी आहे. यापैकी २९९ ग्राहकांवर तडजोडीपोटी १० लाख २१ हजाराचा दंड आकारण्यात आला.