भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्याला सोमवार पासून जोरदार पावसाने झोडपून काढले. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असुन अनेक मार्ग बंद पडल्याने नागरीकांना मोठया अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसामुळे साकोली तालुक्यातील काही गावांतील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरीकांनामोठया त्रासाला समोर जावे लागत आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असुन पाणी साचल्याने जिल्ह्यातील अनेक मार्ग रहदारीकरीता बंद करण्यात आले आहेत. गोसे धरणाच्या पानलोट क्षेत्रात झालेल्या जोरदारपावसामुळे गोसे धरणाचे सर्वच्या सर्व दरवाजे उघडण्यात आले आहे.या पावसामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.
हवामान विभागाने दि.११ सप्टेंबर रोजी जिल्ह्याला रेड अलर्ट दिला असुन प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणुन जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहिर केली आहे. जिल्ह्यातील सातही तालुक्यात पावसाने दिनांक ९ सप्टेेंबर पासुन जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून शेत शिवार जलमग्न झाल्याची परिस्थिती आहे. अनेक गावांना जोडणारे ग्रामीण रस्ते,पूल पाण्याखाली आल्याने वाहतुक व्यवस्थेवर त्याचा परिणाम दिसुन आला. गोसे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडलयाने गोसे धरणाची २३ दरवाजे १ मीटर तर १० गेट ०.५ मिटरने उघडण्यात आली आहेत.