भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : तालुक्यात या पावसाळी हंगामात दिनांक ९ व १० सप्टेंबर रोजी आलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेत शिवार जलमग्न झाल्याची परिस्थिती आहे. तालुक्यातील अनेक गावांना जोडणारे ग्रामीण रस्ते पूल पाण्याखाली आलेले असून वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. साकोली तालुक्यातील तसेच शहरातील सखल भागातील घरात पाणी शिरले असून जलजमावाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शिवनी बांध जलाशय ओवर फ्लो झाले असून पर्यटकांनी गर्दी केली आहे. तालुक्यातील अधिकतर तलाव बोळ्या तुडुंब भरून वाहत आहेत. तालुक्यात ९ ते १० सप्टेंबर रोजी दरम्यान साकोली मंडळात १४३.३ मिमी, एकोडी मंडळात १०७.६ मीमी ,व सानगडी मंडळात ११०.२ मीमी अशी या पावसाळी हंगामातील सर्वाधिक पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात शेतपिक पाण्याखाली आलेले असून नैसर्गिक संकटामुळे जनजीवन अस्तव्यस्त झाल्याचे चित्र आहे. तालुक्यातील साकोली ते खैरलांजी रोड वरील सत्संग जवळील नाल्यावरुन् पाणी वाहत आहे. सध्या वाहतूक सुरु आहे. विर्शीं फाटा ते वीर्शि दरम्यान नाल्यावर एक फूट पाणी वरून वाहत असल्याने रस्ता बंद झाला.
विर्शीं ते उकारा नाला वरील रस्ता बंद झाला, सेंदूर वाफा ते लवारी मुख्य रस्ता बंद ,खाबा ते वडेगाँव मार्ग नाल्यावर पाणी आल्यामुळे रस्ता बंद झाला आहे, सराटि चीचगाव रस्ता बंद झाला ४ ते ५ फूट पाणी आहे. वाहतूक साठी पयार्यी रस्ता आहे.बॉम्पेवाडा ते आमगाव रस्त्यावर पाणी वाहत असल्याने रस्ता बंद आहे.बोदरा-सोनपुरी मार्ग बंद ,सानगडी विहीरगाव रस्ता,सानगडी सानगाव रस्त्यावर पाणी वाहत आहे. तालुक्यातील अनेक गावा दरम्यान असलेल्या लहान मोठया नाल्यावरील पुलावर पाणी आहे. परंतु लोक जीवाची पर्वा न करता जाणे येणे करीत आहेत. सानगडी विहीरगाव दरम्यान नाल्यावर पाण्याची ओढ आहे तरी लोक मोटारसायकल व पायी ये जा करीत आहेत. विहीरगाव भुगांव दरम्यान चुलबंद नदी पाण्याने उफाळून जात आहे आणि लोक लहान मुले घेऊन पुलावरून पाण्याची मजा घेत आहेत. सदर पुलावर जत्रेचे स्वरूप आले आहे. पाण्याचा प्रवाह जोरात आला तर मोठी घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान तहसीलदार निलेश कदम यांनी तालुक्यातील पूरग्रस्त भागातील परिस्थितीची पाहणी सुरु केली असून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याकरिता महसूल कर्मचारी सतर्क आहेत.