भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाने सूयार्टोला परिसरातील बांधतलाव ओव्हरμलो झाला असून, परिसराला तलावाचे स्वरूप आले आहे. पावसाचे पाणी अनेकांच्या घरांमध्ये शिरले. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात सोमवारी (ता. ९) रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर मंगळवारी (ता. १०) दुसºया दिवशी कायम होता. पावसाने जिल्ह्यात तुफान बॅटिंग केली. आठही तालुक्यांत पूरपरिस्थिती निर्माण झाली होती.
अनेक भागांमध्ये पाणी साचून असल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. कित्येकांच्या घरात पाणी शिरल्याने साहित्यांची प्रचंड नासाडी झाली. शहरातील हनुमाननगर, अयोध्यानगर, गजानन कॉलनी, इंद्रप्रस्थ कॉलनी, न्यू लक्ष्मीनगर, राजाभोज कॉलनी परिसर, कुडवा नाका परिसर, रामनगर परिसर जलमय झाला होता. बुधवारी पाऊस थांबला असला तरी, अजूनही नागरिक पावसाच्या फटक्यातून सावरले नाहीत. असे असतानाच सूयार्टोला परिसरातील बांधतलाव ओव्हरμलो झाला. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या घरांमध्ये गुडघाभर पाणी साचले आहे. परिसराला तलावाचे स्वरूप आले आहे. घरातील साहित्यांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. उल्लेखनीय म्हणजे, अतिक्रमणधारकांनी नाल्यावर घरे बांधली आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जात नाही. याबाबत परिसरातील नागरिकांनी अनेकदा संबंधित यंत्रणेकडे तक्रारी केल्या. परंतु, यंत्रणेने तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती उद्भवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.