भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : ९ ते १० सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे गोसे खुर्द धरणामुळे पाण्याची मोठी वाढ झाली असून त्याचा फटका चुलबंद नदी व नाल्यांना बसला. नदिनाल्यांच्या पाणीपात्रात मोठी वाढ झाली असून पुराच्या पाण्याखाली धान शेती आल्याने हातात आलेला धान पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. भंडारा येथील वैनगंगा नदीवरील लहान पूल पाण्याखाली आला असून पुराच्या पाण्याची पातळी वाढली आहे. लाखांदूर तालुक्यातील चुलबंद नदि व नाल्यांमध्ये आल्याने पुराचे पाणी वाढले आहे.
लाखांदूर-पवनी मार्गावरील चुलबंद नदीला लागूनच नाल्याला आलेल्या पाण्यामुळे नाल्यालगतची धान शेतीत पुराचे पाणी शिरले आहे. चुलबंद पुलावर रस्त्यांवर २ फूट पाणी चढला असुन हा रस्ता बंद करण्यात आला आहे. तसेच तालुक्यातील भागडी-चिंचोली व तई / बू, बारवा पुलावर पुराचे पाणी असल्यामुळे हा मार्ग बंद ठेवण्यात आले. शेतशिवाराही पुराचे पाणी शिरले असून धान पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या धान पीक गर्भात असून निसव्याच्या अवस्थेत असल्याने या पुराचा फटका बसणार आहे. येथील चुलबंद नदी व वैनगंगा किनाºयावर असलेले लाखांदूर, सावरगाव, खैरी (पट), आसोला, विहीरगाव, गवराला, डांभेविरली, मांदेड, चिंचोली, आथली, भागडी, बोथली, धर्मापुरी पुराच्या पाण्याने शेती वेढले आहे. गोसेखुर्द धरणा मधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने वैनगंगा सोबतच चुलबंद नदीच्या पानीपात्रात वाढ झाल्यामुळे नदी काठावरील शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले आहे.