भंडारा पत्रिका / प्रतिनिधी ) तुमसर:- मुसळधार पावसातही नागरिकांनी अलोट गर्दी पाहता लोकभावना महाविकास आघाडीच्या बाजूने आहे हे दिसते . विदर्भात व महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत जनतेने दिलेला कौल पाहता महाराष्ट्रातून ही आता आपली सत्ता जाणार म्हणून सरकार वाटेल त्या घोषणा करत आहे. मात्र या भूलथापांना बळी न पडता विधानसभा निवडणुकीत गद्दारांना धडा शिकवून नवा इतिहास घडवूया असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
तुमसर येथे आयोजीत शिवस्वराज्य यात्रेच्या सभेत ते बोलत होते.यावेळी मंचकावर खासदार अमोल कोल्हे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, विद्यार्थी सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे,माजी आमदार दीनानाथ पडोळे , बजरंगसिह परिहार, दिलीप पणकुळे,जानबा मस्के ,पंडित कांबळे, अरुण धमार्ळे,माजी खा मधुकर कुकडे, उपसभापती कृ बा स रामदयाल पारधी,रा का जिल्हाध्यक्ष किरण अतकरी, रायुका जिल्हाध्यक्ष ठाकचंद मुंगुसमारे , महिला जिल्हाध्यक्ष अनिता गजभिये, जि. प. सदस्य नरेश ईशवरकर, एकनाथ फेंडर, राजू देशभ्रतार , सुषमा पारधी, प्रमोद घरडे, रामप्रसाद कटरे, संजय नासरे, माधव नारनवरे सुखराम अतकरी, सकील पठाण राजेश शिवरकर, नरहरी वरकडे मयूर जनबंधू, छगन पारधी, शाहिना खान, हेमराज नागफासे, एजाज शेख, शाम कांबळे, जितेंद्र तुरकर, रजत काहालकर, कुणाल मलेवार, राहूल तुमसरे आदीं पदाधिकारी उपस्थीत होते. पुढे बोलतांना जयंत पाटील यांनीयुती सरकार वर हल्लाबोल करताना अनेक विषयांवर हात घातला.
त्याच बरोबर पक्षात इंनकमिंग करणा?्या नेत्याची संख्या वाढली आहे. मात्र दु:खाच्या काळात ज्यांनी पक्षाला बळकटी दिली. त्याच मावळ्यांना पक्षाची तिकीट दिली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट करत तुमसर विधानसभेत होत असलेल्या चचेर्ला पूर्णविराम दिला. तर संसद रत्न खासदर अमोल कोल्हे यांनी त्यांच्या स्टाईल ने एकदा चुकीला माफी दिल्या जावू शकते मात्र गद्दाराना माफी नाहीच. असे बोलून त्यांनी गोंदियाचे हेविवेट नेते प्रफुल पटेल वर निशाणा साधला. तर युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांनी ना मंदिर की आरती से ना मज्जिद की अजान से हमे तकलीफ हैं. तकलीफ हैं तो युवा साथियोके बेरोजगार रहने से है असे सांगून महाराष्ट्रातील अनेक रोजगार कसे गुजरात ला पळविले गेलीत त्याचा पाळाच वाचला.
दरम्यान यावेळी तुमसर विधानसभा क्षेत्रातील नागरिकांसाठी सुरु करण्यात आलेल्या सुरक्षा कवच योजनेचा शुभारंभ जयंत पाटील यांच्या हस्ते पॉलिसी वितरीत करण्यात आले.तसेच विवीध पक्षातून आलेले माजी जि प सदस्य , पंचायत समिती सदस्य, ग्राम पंचायत सदस्य सह शेकडो विवीध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात प्रवेश केला. या जाहीरसभेसाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने ठाकचंद मुंगुसमारे यांनी एकप्रकारे शक्ती प्रदर्शन केल्याचे चित्र समोर आले. असून एकप्रकारे निवडणुकीचे रणशिंगच फुंकले गेलेआहे.जाहीर सभेचे संचालन राहूल डोंगरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार दिलीप सोनुले यांनी मानले. सभेला तुमसर मोहाडी तालुक्यातील जवळपास १० हजार स्त्री पुरुष कार्यकर्ते व नागरीक उपस्थित होते.