सिहोरा -मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या सिमेवर व भंडारा जिल्ह्याच्या अंतिम टोकावर असलेल्या पुलावर अंदाजे ३ ते ४ फुटाचे वर पाणी असल्यामुळे मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राचा संपर्क आज मध्य रात्री १० ते १२ वाजे पासुनच तुटला आहे. पोलीस स्टेशन सिहोराचे ठाणेदार आपल्या पोलीस चमू सह नियंत्रणावर पाळत ठेवून आहेत तर महसूल व वन विभागाची यंत्रना सुद्धा सज्ज असून नियंत्रणावर पाळत ठेवून आहे.पाण्याची पातळी वाढल्यास बपेरा गावात पाणी शिरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी जुलै महिन्यात २२ व २३ जुलै दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळेमध्यप्रदेश आणि महाराष्ट्राचा संपर्क तुटला होता हे येथे उल्लेखनीय आहे. ९ सप्टेंबर पासून सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे बपेरा बावनथडी व वैनगंगा (संगम) नदी दोन्ही तुडुंब भरून वाहत आहेत. अतिवृष्टीमुळे शेत शिवाराला सुद्धा तलावाचे स्वरूप आले आहे.धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
वैनगंगा नदीच्या पुरामुळे परसवाडा,ककार्पूर ,रेंगेपार, पांजरा व नदी परिसरातील अनेक ठिकाणच्या पुलावर पाणीच पाणी दिसत आहे.यात शेतकºयांची शेकडो एकर शेती पाण्यात बुडाली असून वैनगंगा नदीच्या पुराची पातळी वाढत चालली आहे.सध्यापाण्याची पातळी वाढत असली तरी पूर परिस्थिती मात्र नियंत्रणात असून अजून कुठेही अप्रिय घटना घडल्याचे वृत्त नाही. नदी काठावरील गावांना सतर्क राहण्याची गरज आहे.सततचा पाऊस व मध्य प्रदेशातील प्रकल्पातुन सोडण्यात येणाºया पाण्यामुळे बपेरा बावनथडी व वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे.जर हीच परिस्थिती असली तर नदी काठावरील गावांना धोका उद्भवण्याची शक्यता नाकारता येणार नाही.नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.वृत्त लिहीपर्यंत पूर संथ गतीने वाढतच आहे .पुर कमी होण्याची शक्यता नाही हे येथे उल्लेखीत आहे.