भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : तालुक्यातील परसोडी रेती घाटावरून टिप्पर व ट्रॅक्टर मध्ये अवैधरित्या ओव्हरलोड (क्षमतेपेक्षा अधिक) रेती भरून वेळेची अट न पाळता रात्री बे रात्री होत असलेल्या अवैध रेती वाहतुकीस ग्रामस्थांनी केली अडवणूक. अवैधरित्या रात्री बे रात्री क्षमतेपेक्षा अधिक शासकीय नियमांची अंमलबजावणी न करता होत असलेल्या या नियमबाह्य रेती तस्करी ला कंटाळून संतप्त ग्रामस्थांनी दिनांक ९ सप्टेंबर रोजी ७.३० वाजेच्या दरम्यान अवैधरित्या रेतीने ओवरलोड भरलेले रेतीचे पाच टिप्पर पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. सदर कारवाई मध्ये पोलिसांनी एकूण ९६.०५,००० लक्ष रूपयांचा मुददेमाल जप्त केला आहे. सदर रेती घाटावरील टिप्पर चालक व रेतीघाट मालक यांच्या मनमानी गैर कारभारामुळे रेती घाट व्यावसायिक व रेती वाहतूकदा- रांबद्दल ग्रामस्थांमध्ये रोष व्याप्त आहे.
प्राप्त माहितीनुसार परसोडी येथील रेतीघाट शासकीय लिलावात देवरी तालुक्यातील चिचगड निवासी निखील झिंगरे वय ४० वर्ष यांच्या नावाने झाला आहे.
रेती घाटावर वाहतुकीकरिता जाण्या येण्यासाठी परसोडी गावातून रस्ता आहे. मोठ्या प्रमाणात टिप्पर व ट्रॅक्टर मध्ये क्षमतेपेक्षा अधिक रेती भरून रात्री बेरात्री अवैधरित्या होत असलेल्या रेती वाहतुकीमुळे गावातील रस्त्याची दुरावस्था झाली आहे . ग्रामस्थांनी अनेकदा याविषयीची तक्रार संबंधित प्रशासनाला केली होती. रेती घाट मालक व रेतीवाहतूकदार वेळेच्या अटी व शर्ती चे पालन न करता, क्षमतेपेक्षा अधिक रेती ट्रॅक्टर व टिप्पर मध्ये भरून रात्री बे रात्री वाहतूक करीत असल्याची माहिती संबंधित प्रशासनाला दिली होती. ट्रॅक्टर व टिप्पर मध्ये क्षमतेपेक्षा अधिक रेतीभरून वाहतूक करीत असल्याने गावातील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिकांसह तसेच ग्रामस्थांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे झाल्याने रस्त्यावर चालणे कठीण झाले असून किरकोळ अपघाताला कारणीभूत ठरत आहे.
याविषयी प्रशासकीय व्यवस्थेक- डून कोणत्याच प्रकारची कारवाई होत नसल्याने अखेर ९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास जवळपास २०० ते ३०० संतप्त ग्रामस्थांनी एकत्र येऊनवेळेच्या अटी व शतीर्चे पालन न करता अवैधरित्या रेतीने भरलेले ओव्हरलोड असलेले पाच टिप्पर पकडून ठेवले. या प्रकरणाची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच थानेदार व तहसीलदार यांना देण्यात आली. ठाणेदार संजय गायकवाड व तहसीलदार निलेश कदम यांनी घटनास्थळी तात्काळ भेट दिली व योग्य कारवाई करण्याचे ग्रामस्थांना आश्वासन दिले .
फिर्यादी सरपंच सौ. जयश्री दिलीप पर्वते वय ३८ यांच्या तक्रारीवरून थानेदार गायकवाड यांनी टिप्पर चालक-मालक व रेतीघाट मालक यांच्यावर कारवाई करून टिप्पर क्रमांक एम. एच. ३६ ए. बी . ३३१५, एमएच ३६ ए.ए. ३६६९, एम. एच. ३६ एए ३३१५, एम. एच. ३६ ए ५३५८,एम. एच. ४० बीएल ८७९०, सदर पाचही टिप्पर जप्त करून आरोपी चालक प्रमोद वसंता लांडगे वय ३८ वर्ष रा. खैरलांजी,मनोज बळीराम नेवारे वय ३० वर्ष रा. शिवाजी वार्ड साकोली, कृश्णपाल सुर्यभान राउत वय ३५ वर्ष रा. विर्षी ता. साकोली, प्रदीप सुखदेव बावरे वय ३८ वर्ष रा. बाम्हणी ता. साकोली, सलिष दिलीप सोनवाने वय २८ वर्ष रा. कोळी बोरगाव ता.नागपुर, ट्रक मालक अतुल बडोले साकोली,ट्रक मालक कुलदीप राउत रा. साकोली, रूपेष टेभुर्ण रा. साकोली, ट्रक मालक प्रणय जांभुळकर रा. नागपुर, रेतीघाट मालक निखील झिंगरे वय ४० वर्षे रा. चिचगढ ता. देवरी जि. गोंदिया यांच्या विरोधात अप क्र.४८२/२०२४ कलम ३०३(२),३(५) मा.न्या.स. अन्वये गुन्हा दाखल करून एकुण ९६.०५, ००० लक्ष रू. चा. मुददेमाल जप्त केला आहे. पुढील तपास ठाणेदार संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पो उप नी प्रशांत वाडुले करीत आहेत.