‘बिटिया तुम पर नाज है’ कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : ‘बिटिया तुम पर नाज है’ बेटी बचाव संकल्पने अंतर्गत संगीतमय प्रबोधनाचा कार्यक्रम कटअ हॉल भंडारा येथे यशस्वी आयोजित करण्यात आले. या शीर्षकाखाली आपण मुलींचा कितीही सन्मान जरी करण्याच्या दावा करत असलो तरी पण सत्य परिस्थिती काय आहे हे आपणास जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. नालंदा लोककला मंच बहुउद्देशीय संस्था दवडीपार च्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार प्रशांत उपस्थित होते. मुख्य मार्गदर्शक म्हणून धनंजय तिरपुडे, प्रेमसागर गणवीर तर प्रशासकीय अधिकारी आणि विविध क्षेत्रात कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . आज सरकार जरी बेटी बचाव या विषयावर बोलत असेल तरी पण दिवसाला कित्येक घटना अजूनही होत आहेत. या देशांमध्ये खरंच ही लेक सुरक्षित आहे का? नुसतं बेटी बचाव किंवा लेक वाचवा, लेक शिकवा अशा घोषणा दिल्याने या समाजातील स्त्री ही सुरक्षीत राहील असं जर आपल्याला वाटत असेल तर हा आपला एक गैरसमज आहे, हे आपल्याला मान्य करावे लागेल. कोलकता मध्ये झालेल्या डॉक्टर मुलीवरती बलात्कार आणि खून. बदलापूर येथील घटना, खैरलांजी, हातरस अशा कित्येक घटनांचे उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहेत.

यामधून आपणास हे कळेल की नुसतच बेटी बचाव चा नारा दिल्याने होणार नाही तर आपली वैयक्तिक जबाबदारी, महिलाबाबत हया पुरुषप्रधान संस्कृती मध्ये असलेली न्यूनगंडता आणि विकृत मानसिकता ह्या गोष्टींमध्ये बदल घडवून आणणे अत्यंत आवश्यक आहे, काळाची गरज आहे. नालंदा लोककला मंच, मागील १४ वर्षापासून एचआयव्ही, एड्स, भ्रूणहत्या, हागणदारी मुक्त गाव, लेक वाचवा लेक शिकवा, साक्षरता मिशन अशा अनेक सामाजिक विषयांवर कार्य करत आहे. २०१९ मध्ये सिकलसेल आणि थॅलेसेमिया या रुग्णांकरता संगीत प्रबोधनाचा कार्यक्रम घडवून आणला होता. २०२२ मध्ये “सुर निरागस हो” या शीर्षकाखाली बेटी बचाव ह्या विषयाला वाचा फोडण्या प्रयत्न केला. आणि आता २०२४ मध्ये पुन्हा एकदा तोच प्रयत्न या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. आणि तो यशस्वी ठरला असं म्हणता येईल. लोकांची गर्दी जर कार्यक्रमाला असेल आणि तरच तो कार्यक्रम यशस्वी ठरला असं जर समीकरण असेल तर हे अत्यंत चुकीचे वक्तव्य आहे. चुकीचं प्रमाण आहे, चुकीचं उदाहरण आहे.

गर्दी असून जर लोकांमध्ये जर जनचेतना होत नसेल, मुलींशी स्त्रियांशी आणि महिलांविषयी आपल्या मनातील भावना ह्या दुय्यम दर्जाच्या असतील, तर आपल्या शिक्षणाचा उपयोग काय?, या कार्यक्रमात डॉ. प्रांजली पडोळे, डॉ.अश्विनी भोंडेकर, डॉ.मंजुषा रंगारी, डॉ. पद्मजा जोगेवार, डॉ.सुचिता घडसिंग, डॉ. निशा भावसार या सहा महिला डॉक्टरांना त्यांच्या केलेल्या सेवेकरिता संस्थेच्या माध्यमातून महिला डॉक्टर सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नालंदा लोककला मंचचे सचिव सुशील खांडेकर कार्यक्रमादरम्यान आपला अनुभव सांगतात की, देशामध्ये जर समजा एखाद्या मुलीवरती अत्याचार अन्याय झाला तर तिच्या त्या अन्यायाच्या विरोधामध्ये हातामध्ये मेणबत्ती घेऊन आपण रस्त्यावरती उतरतो पण त्याच अन्यायाला वाचा फोडण्याकरता जेव्हा अशा प्रकारचे कार्यक्रम आपल्या स्थानिक भागात घेतल्या जातात तेव्हा लोकांचा फारसा तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यांचा हात खिशापर्यंत पोहोचत नाही.

किमान लोक वर्गणीतून जर समजा असा कार्यक्रम होत असेल तर अशा कार्यक्रमांना आपण सर्वांनी एक सजक जाणकार नागरिक म्हणून मदत करायला पाहिजे. जनचेतना कशी करता येईल याच्यावरती काम करायला पाहिजे. आणि अशा कलावंतांना अशा संस्थांना आपण प्रोत्साहन दिले पाहिजे. पण तसं न करता उलट संस्थेच्या मार्फत आलेल्या लोकांना आपल्या मागे फिरवून त्यांना पाहिजे तसे सहकार्य आणि सहयोग करत नाही, ही विटंबना आहे. नालंदा लोककला मंच बहुउद्देशीय संस्थाचे कलावंत चमू, यात प्रा. अश्विन खांडेकर यांनी आपल्या प्रभावी निवेदनाच्या माध्यमातुन संबंधित विषयाचे अहवाल सादर करून शासनाची कान उघडणी केली. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नृत्यकार प्रियदर्शन सोनटक्के यांनी आपल्या नृत्याच्या माध्यमातुन मुलीचे दु:ख बोलून दाखवलं, मास्टर राकेश कोडापे यांनी मार्शल आर्ट च्या माध्यमातून आत्मरक्षणाचे महत्व समजावून सांगितले. दिपक लाहोरी, विपिन लेंढे, रोशन राखडे, विवेक फाये, आशीष मेश्राम, चाहूल नागपुरे, राहुल हुमने, मोनिका शेंडे, वैशाली शास्त्री या कलावंतांनी संगित साथ देऊन गीतांच्या माध्यमातुन प्रेक्षकांना बांधून ठेवले. संस्थेच्या अध्यक्षा बेबिलता खांडेकर, डॉ.अरुणकुमार डांगे, परमानंद मेश्राम सामा. कार्यकर्ता, आशू गोंडाणे, डॉ. यशवंत लांजेवार, प्रा. अनमोल देशपांडे, अंकुश वंजारी, राकेश चेटुले, पुरूषोत्तम बुरडे, अंकित पगारे आदी मान्यवरांनी संस्थेच्या पुढील वाटचाली करीता सदिच्छा व्यक्त केल्या.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *