भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : येथील पोलीस सभागृहात शांतता, सुरक्षा आणि जातीय सलोखा कार्यक्रमांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासंबंधी उपस्थित बंधू आणि भगिनींना मार्गदर्शन करताना लाखनी शहरात यूपीएससी आणि एमपीएससीचे क्लास जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये निर्माण करण्यासाठी पोलीस अधीक्षक वचनबद्ध आहे आणि ही नगरी अशोक लेलँड, एमआयडीसी तसेच बाजूच्या परिसरामध्ये भेल प्रकल्प हा पूर्ववत सुरू व्हावा यासाठी अनेक नागरिकांची मागणी आहे. कायदा व सुव्यवस्था च्या माध्यमातून गुन्हेगारी, अवैध व्यवसाय, अमली पदार्थ, तस्करी, चोरी दारू, गांजा समाजामध्ये भेडसावणाºया समस्यांना पोलिसांची मदत करणे हे सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे.गुन्हेगारांची नावे कळवा, अभय देऊ, शहराच्या विकासा करिता सामाजिक भांडवल अत्यंत महत्त्वाचे आणि लाखनीचे नागरिक हे अतिशय आदरयुक्त शांतप्रिय, प्रेमळ नागरिक असल्याची खुशबू कुछ और है असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी केले. शांतता व सुरक्षा मस्जिदमध्ये अमन शांती राहील असा विश्वास मस्जिदचे अध्यक्ष अब्दुल गμफार यांनी केले.
या प्रसंगी लाखनी शहरात अनेक वर्षे लोटली तरीही संविधानिक मार्गाने परिवर्तन घडवून आणले जाते, प्रत्येक धर्माचा आदर, सन्मान केला. लाखनी ही शिक्षणाची माहेरघर आहे. शिक्षणाची नगरी आहे, असे प्रतिपादन डॉ रेवाराम खोब्रागडे यांनी केले. इथे अनेक वकील, डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक तयार झालेले आहेत. माणसाचास्वभाव त्याच्या व्यापार सामाजिक दायित्व एवढेच काय माणसांमध्ये प्रेम हिंदू धर्मातील अनेक सन उत्सव गणपती, दिवाळी, दसरा आणि बौद्ध बांधवांमधील धम्मचक्र, डॉ बाबासाहेब जयंती, प्रवर्तन दिन बुद्ध पौर्णिमा त्याचप्रमाणे मुस्लिम बांधवांचे उत्सव ईदए-मिलाद, रमजान ईद असे अनेक सण सामान्यपणे शांततेमध्ये अनेक वर्षापासून पार पडतात याच भागातील ६३ गाव आणि पोलीस पाटील या लाखनी तालुकामध्ये आहे. एमआयडीसी, अशोक लेलँड, भेल प्रकल्प आहेत असे लाखनी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन होमराज कटरे आणि आभार सेवकराम टीचकुले यांनी व्यक्त केले या प्रसंगी उपस्थित नरेश इलमकर, डॉ सुरेश खोब्रागडे, मनीष गुरूनानी, मोहसीन इद्रिस आकबानी, अर्पित गुप्ता, पोलीस पाटील उपस्थित होते.