भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : शहरातील मुख्य रस्त्यावर व्यवसायीकांनी अतिक्रमण केल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होवुन नागरीकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता.अखेर आज दि.१२ सप्टेंबर २०२४ रोजी भंडारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी करणकुमार चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात आली.त्यामुळे शहरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. भंडारा शहरातील मुख्य रस्त्यालगत दुतर्फा व्यापाºयांनी रस्त्यावर आपली साहित्य व शेड काढुन अतिक्रमण केल्याने रहदारीस अडथळा निर्माण होवुन नागरीकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता.
या मार्गाने वाहन चालवितांना तसेच पायी चालणाºयांनासुध्दा जीव मुठीत घालुन प्रवास करावा लागत होता. एवढेच नाही तर याठिकाणी अनेकदा अपघातसुध्दा झाले आहेत. त्यामुळे शहरातील रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची मागणी मागील अनेक दिवसांपासुन केली जात होती. आज भंडारा नगर परिषदेतर्फे गांधी चौक ते पोस्ट आॅफीस चौक तसेच गांधी चौक ते हेडगेवार चौक या मुख्य मार्गावरील व्यावसायीकांनी सार्वजनिक रस्ते व नालीवर केलेले अतिक्रमण जेसीबी च्या सहायाने काढण्यात आले. सदर कारवाई न.प. मुख्याधिकारी करणकुमार चौहान यांच्या मार्गदर्शनात आकाश शहारे, मुकेश कापसे, पवन कनोजे, संकेत कोचे, कु. धनश्री वंजारी, अतुल पाटील, दिनेश भावसागर, मुकेश शेंद्रे, प्रशांत मेश्राम, कु. मोनिका वानखेडे, मिथुन मेश्राम यांनी केली.