पावसामुळे नुकसान झालेल्या शेती व घरांचे तात्काळ पंचनामे करा!

भंडारा:- भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात मुसळधार पाऊसासह मोठ्या प्रमाणात गारपीठ झाल्याने शेतकºयांच्या शेतमालाचे व शेतीचे झालेल्या नुकसानीची त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याबाबत जिल्हाधिकारी भंडारा यांना आ.परिणय फुके यांनी सूचना दिल्या आहेत. जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात पाऊस व विजेमुळे मोठया प्रमाणात शेतकºयांचे नुकसान झालेले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. कुटुंबाचे उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न आज शेतकºयांसमोर उभा आहे.तरी भंडारा जिल्ह्यात पुर व पावसामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याबाबत आपल्या स्तरावरून संबंधित अधिकाºयांना सूचना व नुकसान भरपाई देण्याबाबतचा प्रस्ताव त्वरित शासनाकडे सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी भंडारा यांना आ.परिणय फुके यांनी दिल्या.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *