भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : मागील दोन दिवसांपासून जिल्ह्या सह लगतच्या राज्यात होत असलेल्या अतिवृष्टी मुळे पुर परिस्थिति निर्माण झालेली आहे. भंडारा विधान सभेचे आम. नरेंद्र भोंडेकर यांनी आज पुर ग्रस्त परिवारांची भेट घेतली आणि शासन तर्फे हवी ती मदत मिळवून देण्या करीत जिल्हाधिकारी व संबंधित विभागास निर्देश दिले. या पुर परिस्थिति नंतर पुढे आलेल्या बुडीत क्षेत्राच्या पुनर्वसन करिता विशेष बाब म्हणून शासन दरबारी तगादा लावण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित विभागास दिले. वैनगंगा नदीच्या तीरावर बसलेल्या भंडारा विधानसभेच्या भंडारा आणि पवनी या दोन्ही तालुक्यातील अनेक गावांना दर वर्षी पुर परिस्थितीचा सामना करावा लागतो.
या पुरामुळे भंडारा शहर लगतचे क्षेत्र जसे ग्राम सेवक कॉलॉनी, गणेशपूर, कारधा हे सुद्धा जाळमग्न होतात. दोन दिवस झाली जिल्ह्यात पावसाने तगादा लावला असून लगतच्या राज्यांचे ही धरण तुडुंब भरले आहेत. अश्यात या धारणांची दारे उघडल्याने भंडारा जिल्ह्यातिल नागरिकांना याची झड पोहाचुन दोन्ही तालुक्यातील अनेक गावे पुराने वेढली गेली आहे. गणेशपूर क्षेत्रातील काही परिवारांना हलवून येथील जिल्हा परिषद शाळेत त्यांच्या राहायची व्यवस्था करण्यात आली आहे. जेथे आम. भोंडेकर यांनी बुधवारी सायंकाळी भेट दिली आणि परिवारांची विचारपूस केली.
पूरग्रस्त गावांमध्ये भंडारा तालुक्यातील खमारी, करचखेडा, कारधा, भोजापूर, दाभा, कोथूर्णा सहित अनेक गावांचे समावेश आहे. या गावांमधील पुर ग्रस्तांना भेटण्या करिता आम. नरेंद्र भोंडेकर हे आज स्वत: गावा पर्यन्त पोहोचले. आम. भोंडेकर यांनी तालुक्यातील खमारी, करचखेडा, कारधा, भोजापूर, दाभा, कोथूर्णा या गावांना भेट दिले.
या दरम्यान पूर ग्रस्त नागरिकांनी आम. भोंडेकर यांच्या समोर आपल्या व्यथा मांडल्या. आम. भोंडेकर यांनी पुरग्रस्त परिवारांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि ज्यांचे पुनर्वसन गोसे बाधित म्हणून होऊ शकले नाही त्यांना शासनच्या विशेष बाब अंतर्गत पुनर्वसन करून देणे आणि आर्थिक मदत मिळवून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी व संबंधित विभागाला फोन द्वारे दिले. या सोबतच ज्या शेतकºयांच्या शेतात पुराचे पाणी गेले आहे आणि शेत पिकांचे नुकसान झाले आहे त्यांना सुद्धा आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. या दौºयात त्यांच्या सोबत शिव सेनेचे जिल्हा अध्यक्ष अनिल गायधने, तालुका प्रमुख नरेश झलके, विभागीय अधिकारी गजेंद्र बालपांडे, भंडारा तहसीलदार सौ वनिता लांजेवार सह गावातील सरपंच व अन्य पदाधिकारी सामील होते.