पुराच्या पाण्याने धान पिकांचे मोठे नुकसान

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यात ९ ० १० डिसेंबर रोजी आलेल्या पावसामुळे पुरपरिस्थीती निर्माण झाली असुन त्याचा नागरीकांना मोठा फटका बसला आहे.जिल्ह्यातील अनेक रस्ते उखडले असुन लहान-मोठया पुलांचे नुकसान झाले आहे.तर अनेक ठिकाणी घरांची पडझड होवुन नागरीकांचे नुकसान झाले आहे.अनेकांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने घरातील साहित्यांचे मोेठे नुकसान झाले आहे.जिल्ह्यातील काही गावांना पुराच्यापाण्याने वेढा दिल्याने तेथील नागरीकांना प्रशासनाच्या मदतीने सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.मात्र यामध्ये सर्वाधीक फटका हा शेतकºयांना बसला आहे.

जिल्ह्यात उद्भवलेल्या पुरपरिस्थितीमुळे जिल्ह्यातील हजारो एकर धानपिकांचे नुकसान झाले असुन नुकसानग्रस्त शेतकºयांना शासनाने हेक्टरी एक लाख रूपये आर्थिक मदत देण्याची मागणी भंडारा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याचेमुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे. दिनांक ९ व १० सप्टेंबर २०२४ रोजी विदर्भात भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर व गोंदिया , जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली.तसेच महाराष्टÑ राज्यालगतच्या मध्य प्रदेशमध्ये सुध्दा जोरदार पाऊस पडल्याने मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील सरदार सरोवर तसेच भंडारा जिल्ह्यातील बावनथडी प्रकल्प व गोंदिया जिल्ह्यातील कालीसरार या धरणातुन मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला.त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीला पुर येवुन जिल्ह्यातील हजारो एकर शेती पुराच्या पाण्याखाली आली.

जिल्ह्यातील शेतकºयांनी शेतात लागवड केलेले हलक्या प्रजातीचे धानपिक हे सध्या फुलबारावर असून काही धानपिक भरणीला आले आहेत तर काही धानपिक भरलेले आहेत. पुराच्या पाण्यामुळे धानावर चिखलमाती बसल्यामुळे धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासह भारीधानालाही मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे. अस्मानी व सुल्तानी संकटामुळे अगोदरच शेतकरी वर्ग कर्जाच्या खाईतलोटला असुन यंदातरी चांगले पिक येईल व आपली कर्जमुक्ती होईल या आशेने शेतकरी वर्ग शेतपिकांची लागवड करीत असतात.

मात्र यंदासुध्दा शेतकºयांच्या डोक्यावरील कर्जाचे ओझे उतरणे सोडाच उलट आलेल्या पुरामुळे शेतातील धानपीकाचे मोठे नुकसान होवुन शेतकरी वर्ग आणखी कर्जाच्या खाईत लोटण्याची दाट चिन्हे आहेत. करीता शासनाने पुरबाधीत शेतीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकºयांना हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत द्यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन निवासी जिल्हाधिकारी स्मिता बेलपात्रे यांनी स्विकारले.यावेळी अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समिती जिल्हाअध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे, विष्णुदास लोणारे ,कोटीराम पवनकर, नितेश बोरकर, पुरुषोत्तम गायधने ,पांडुरंग भेदे,बंडू ढेंगे, दसरथ शहारे उपस्थित होते

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *