भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : तालुक्यातील शेतकºयांना गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागले असून, पिकांचे आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेले पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. या स्थितीत शेतकºयांना तात्काळ मदतीची आवश्यकता असल्याचे मत बहुजन समाज पार्टीचे लाखांदूर तालुका अध्यक्ष चेतन बोरकर यांनी व्यक्त केले आहे. चेतन बोरकर यांनी शासन आणि विमा कंपन्यांकडे त्वरित उपाययोजना करण्याचे आवाहन केले असून, पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकºयांना तातडीने पीक विमा व नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी ठाम मागणी केली आहे. “शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, त्यामुळे शासनाने योग्य ती उपाययोजना करून त्यांना दिलासा द्यावा,” असे बोरकर यांनी सांगितले.
गोसेखुर्द धरणातील पाणी मोठ्या प्रमाणात सोडण्यात आल्याने वैनगंगा नदीकाठच्या शेतकºयांना सलग दोनदा पुराचा फटका बसला आहे. धरणाचे सर्व दरवाजे उघडल्यामुळे नदी ओतप्रोत भरून वाहू लागली, ज्यामुळे लाखांदूर तालुक्यात चुलबंद नदी आणि नाल्यांना पूर आला. यामुळे शेतीसह अन्य मालमत्तांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकºयांनी सांगितले की, चुलबंद नदीचे पाणी वैनगंगा नदीकडे न जाता अडून राहिल्याने पुरपरिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ या नुकसानाची पाहणी करून पंचनामे करावेत आणि शेतकºयांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. शासनाने त्वरित कारवाई करून पुरग्रस्त शेतकºयांना भरीव मदत देणे आवश्यक आहे, असेही चेतन बोरकर यांचे मत आहे.