भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : दिनांक १४ ते १५ सप्टेंबर २०२४ ला दिल्ली येथे वरिष्ठ गटाचे मुलीचे आंतरराष्ट्रीय सॅटेलाईट कप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत भंडारा जिल्ह्यातील खेलो इंडिया तलवारबाजी प्रशिक्षण केंद्रातील कु. मंजिरी तांबे आणि कु. प्राजक्ता गाढवे या दोन खेळाडूंची निवड झाली असून हे दोन्ही खेळाडू भारतीय संघाचा प्रतिनिधित्व करणार आहेत. या दोन्ही खेळाडूनी आपले यशाचे क्षेय आपले आई – वडील खेलो इंडिया तलवारबाजी केंद्राचे प्रशिक्षक सौरभ तोमर, यांना आपले श्रेय दिले आहे.
भंडारा जिल्हा तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष संजीवकुमार बांडेबुचे, उपाध्यक्ष राजेंद्र भांडारकर, सचिव सुनील कुरंजेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती लतिका लेकुरवाळे, एकविध क्रीडा संघटनेचे अध्यक्ष सुर्यकांत ईलमे, भंडारा जिल्हा तलवारबाजी संघाचे मार्गदर्शक निशिकांत ईलमे, क्रीडा मार्गदर्शक योगेंद्र खोब्रागडे, आकाश गायकवाड, वरिष्ठ खेळाडूं शोएब अंशारी, जुबेर शेख, नागेश गायधने, डेलीया नासरे, कुतीका डुंभरे, सबनम पठाण, हिमानी घोडमारे, सुष्टी कळंबे, नीलोफर पठाण, तनु डुंभरे, निखिल कोहाड, प्रितम हलदार, ओमकार देव, भुनेश नागोशे, चेतन वाकेकर, आदित्य सेलोकर या सर्वांनी खेळाडूचे अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.