भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची तात्काळ पाहणी व पंचनामा करुन जास्तीत जास्त मोबदला मिळण्याकरीता नाम. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन मुंबई यांना जिल्हाधिकारी, भंडारा यांच्या मार्फत राष्टÑवादी (अजीत पवार गट) च्या वतीने निवेदन देण्यात आले. दि. ९ व १० सप्टेंबर २०२४ या दोन दिवसामध्ये भंडारा जिल्हयात अतिवृष्टीमुळे शहरात व गाव खेडयात पुर परीस्थती निर्माण झाली. वैनगंगा तसेच जिल्हयात असलेल्या लहान मोठ्या नद्यांना पुर आल्यामुळे जिल्हयात हजारो एकर शेती पाण्याखाली आलेली आहे. अनेकांच्या घरात पुराचे पाणी शिरले. घरामध्ये पाणी शिरल्यामुळे घरे क्षतीग्रस्त झाली. त्यामुळे अनेक कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले असून घरातील अन्न धान्याचे मोठ्या प्रमाणातनुकसान झालेले आहे. पुराच्या पाण्यामुळे धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच जिल्हयात धानाचे पिक असुन धान पिके, मका, भाजीपाला, फळबाग या सर्वांचे अतोनात नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतकरी व नागरीक मोठ्या संकटात सापडलेला आहे.
शहर व गाव खेड्यामध्ये मोठया प्रमाणावर सातत्याने पाऊस झाल्याने गुरांचे गोठे, घरांची पडझड झाले तसेच पिकांचे नुकसान खुप मोठया प्रमाणावर झालेले आहे. शहरातील व ग्रामीण भागातील नुकसान ग्रस्त घरांची पाहणी व पंचनामे करून तातडीने सरसकट मदत देण्याकरीता, पुरग्रस्तांना मदत करण्याकरीता व भंडारा तालुक्यातील कारधा, गणेशपूर व इतर प्रकल्पबाधीत गावाचे पुनर्वसन करण्याची मागणी भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून करण्यात आली. याप्रसंगी निवेदन देतांना उपस्थितांमध्ये भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुध्दे, महाराष्ट्र प्रदेशचे महासचिव धनंजय दलाल, माजी नगराध्यक्ष महेंद्र गडकरी, जि.प. सदस्य यशवंत सोनकुसरे, सभापती सौ. रत्नमाला चेटुले, तालुका अध्यक्ष नरेंद्र झंझाड, कार्याध्यक्ष आरजु मेश्राम, शहर अध्यक्ष हेमंत महाकाळकर, जि.प. सदस्य रजनिश बन्सोड, महिला तालुका अध्यक्ष किर्ती गणवीर, पं.स. सदस्य नागेश भगत, पं. स. प्रभाकर बोदेले, नरेश येवले, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजीत पवार गट) चे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.