भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : दि.१३ सप्टेंबर रोज शुक्रवारला, राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षण संपवण्याच्या विषयात केलेल्या वक्तव्याचा विरोधात भाजपा अनु. जाती मोर्चा भंडारा, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा भंडारा, भाजपा भंडारा शहर, भाजपा युवा मोर्चा भंडारा, भाजपा महिला मोर्चा भंडारा यांच्या वतीने त्रिमूर्ती चौकात निषेध मोर्चा आयोजीत करण्यात आले. या वेळेस प्रदेश अनुसूचित जाती मोर्चा सदस्य रामकुमार गजभिये, प्रदेश शिक्षक आघाडी सदस्य डॉ. उल्हास फडके, प्रदेश अल्पसंख्याक मोर्चा सदस्य आबिद सिद्दिकी, विरोधी पक्ष नेता विनोद बांते, प्रदेश व्यापारी आघाडी सदस्य संतोष त्रिवेदी, जिल्हा महामंत्री मयूर बिसेन, जिल्हा उपाध्यक्ष रुबी चड्डा, विकास मदनकर, कृष्णकुमार बत्रा, जिल्हा ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष मनोज बोरकर, रोशन काटेखाये, अध्यक्ष भाजपा भंडारा शहर सचिन कुंभलकर, शहर महामंत्री प्रशांत निंबोळकर, शैलेश मेश्राम, सूर्यकांत इलमे, युवा मोर्चा अध्यक्ष मनीष तांडेकर, तुषार हट्टेवार, महिला मोर्चा प्रदेश सदस्य माला बघमारे, महिला मोर्चा जिल्हा महामंत्री सौ साधना त्रिवेदी, महिला मोर्चा अध्यक्षा सौ. चंद्रकला भोपे, महिला मोर्चा महामंत्री सौ. श्रद्धा डोंगरे, सौ. जया हिंगणे, सौ. माधुरी तुमाने, आशा उईके, सौ रोशनी पडोळे, अर्चना श्रीवास्तव, अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष भंडारा शहर शोएब अन्सारी, रौनक उजवणे, जागेश्वर साखरवाडे, अमित बीसने, पुरुषोत्तम वैद्य, संजू कटारे, देविदास कुंभलकर, बालु ठवकर, सचिन शहारे व इतर कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येन उपस्थित होते.